कुक्कुटपालनातून महिलांनी व्यवसाय उभारावा; चंद्रकांत अपसिंगे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागातील महिलांचे शिक्षण कमी प्रमाणात असते तसेच ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध नसते मात्र महिलांनी घरी अथवा शेतातच कुक्कुटपालन केल्यास महिलांचा व्यवसाय उभा राहत असल्याने महिलांनी कुक्कुटपालन करावे असे आवाहन डॉ. चंद्रकांत अपसिंगे यांनी केले आहे.

उरळगाव (ता. शिरुर) येथे सिमाई आधार फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण बँक हडपसर यांच्या वतीने ग्रामीण भागातील महिलांसाठी दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन बाबतचे एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना कुक्कुटपालन प्रशिक्षक चंद्रकांत अपसिंगे बोलत होते.

याप्रसंगी सिमाई आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा सिमा पवार, कार्याध्यक्ष भाऊसाहेब कोकडे, जिल्हाध्यक्षा सुवर्णा ताठे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे संजय ढगळे, छाया सकट, प्रकाश मोरे, महिपती काळे, अशोक चव्हाण, सारिका जांभळकर, निकिता सात्रस, राणी बांडे, भाग्यश्री होलगुंडे, लंका पाचुंदकर, द्वारका ओव्हळ, राणी सात्रस, निकिता नवले, आप्पा सात्रस, आशा काळे, गोकुळा साळुंके, कल्पना सात्रस, श्रावण बांडे, कांतीलाल आफळे, कैलास सात्रस यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ग्रामीण भागात महिला शेती करताना काही ठिकाणी जनावरे पाळतात व त्यांची निगा राखतात मात्र महिलांनी शेती सोबत शेळी पालन, कोंबडी पालन सारखा कुक्कुटपालन व्यवसाय केल्यास महिलांना चांगल्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो.

तसेच कुक्कुटपालन साठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान देखील उपलब्ध होत आहे त्यामुळे महिलांनी याचा लाभ घेऊन कुक्कुटपालनच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभा करावा त्यासाठी आवश्यक ते सहकार्य आमच्या माध्यमातून करण्यात येईल, असे देखील कुक्कुटपालन प्रशिक्षक चंद्रकांत अपसिंगे यांनी सांगितले, दरम्यान सिमाई आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा सिमा पवार यांनी सर्वांचे आभार मानले.