देशाच्या विकासासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा; डॉ. वैशाली आहेर

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): महिलांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान अनेकांना प्रेरणा देणारे असून महिलांचे सबलीकरण आपल्या देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे देशाच्या विकासासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे मत मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. वैशाली आहेर यांनी व्यक्त केले आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे उमेद महाराष्ट्र कार्यक्रमाच्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत शिरुर पंचायत समिती तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली एकता महिला ग्राम संघ व स्वयंसिद्धी महिला ग्राम संघ वार्षिक सभा व महिला मेळावा प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. वैशाली आहेर बोलत होत्या.

याप्रसंगी यावेळी पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, सरपंच सविता करपे, उपसरपंच कविता रणसिंग, माजी सरपंच छाया चव्हाण, ज्योती शिर्के, माजी उपसरपंच कविता चौधरी, तनुजा विधाटे, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब काळे, प्रदीप पवार, डॉ. सचिन चव्हाण, अश्विनी लांडगे, उद्योजक विजयबापू करपे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष एकनाथ लांडगे, दादासाहेब शिंदे, प्रभाग समन्वयक अनिल नरके, सुजाता चव्हाण, कामिनी नागवडे, रोहिणी भागवत, सोनाली थोरात, रूपाली भारती यांसह आदी उपस्थित होते. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

दरम्यान ग्रामसंघ इतिवृत्त वाचन करण्यात आले असून महिला सबलीकरण व ससक्तीकरण या विषयावर मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. वैशाली आहेर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब काळे व उद्योजक विजयबापू करपे यांनी मनोगत व्यक्त करत महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेल्या कामांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामिनी नागवडे यांनी केले तर वर्षा काळे यांनी आभार मानले.