Shirur Police Station

शिरुर तालुक्यातील तिघांना नोकरीचे आमिष दाखवत वीस लाखांना गंडा…

शिरुर पोलीस ठाण्यात परप्रांतियांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील तिघा युवकांना केंद्रीय खाद्य विभाग तसेच केंद्रीय रेल्वे विभागात शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तिघा परप्रांतीयांनी तब्बल 20 लाख 33 हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे उपेंदरसिंग बदोरीया, दिनेश रामेश्वर व शुभम सील या तिघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात […]

अधिक वाचा..

सणसवाडीत आज कामगार संवाद मेळाव्याचे आयोजन…

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे शनिवार (दि. १०) सप्टेंबर रोजी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यासाठी कामगार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे शिरुर तालुकाध्यक्ष रेवननाथ गायकवाड यांनी दिली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय येथे कामगारांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यासाठी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात विद्युत वितरण कार्यालयात ग्रामस्थांचा घेराव

विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत केली रोहित्राची मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होऊन ग्रामस्थांना कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून नुकतीच ग्रामस्थांनी महिलांसह शिक्रापूर विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयात मोर्चा काढत, घोषणाबाजी करत विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत अधिकाऱ्याला हार गांधीगिरी आंदोलन करत वीज पुरवठा […]

अधिक वाचा..

माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांच्या पत्नीचे निधन

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील विजयमाला बापूसाहेब थिटे (वय ९०) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. विजयमाला या महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व खासदार कै. बापूसाहेब थिटे यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक राजेंद्र थिटे व धनंजय थिटे यांच्या त्या मातोश्री होत.

अधिक वाचा..

गणेशोत्सवात रक्तदानाचा उपक्रम कौतुकास्पद: कुसुम मांढरे

शिक्रापूर (शेरखान शेख): गेली 2 वर्षे कोरोनाच्या सावटानंतर साजरा होत असलेल्या गणेशोस्तवात काळात आनंद नगर प्रतिष्ठाणने सामाजीक बांधीलकी जपत कै. बाळासाहेब भांडवलकर यांच्या स्मरनार्थ रक्तदान शिबीराचे आयोजन करित समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला असून गणेशोत्सवात रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे पुणे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी सांगितले. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील आनंद नगर प्रतिष्ठाण […]

अधिक वाचा..

बुद्धिस्ट ब्रेवरमैन बनली ब्रिटनची गृहमंत्री…!

गोवा: मुळ भारतातील गोव्याची असलेली बुद्धिस्ट ब्रेवरमैन या कर्तबगार महिलेला ब्रिटन सरकार मध्ये ५६ वी गृहमंत्री म्हणून शपथ देण्यात आली आहे. भारतीय मुळ असलेल्या बुद्धिस्ट महिलेने अटकेपार झेंडा फडकवल्याची ही गौरवपूर्ण घटना आहे. ब्रेवरमैन ही बुद्धिस्ट आहे. ती लंडनच्या बौद्ध विहारात नियमीतपणे वंदनेला जाते. तीने ब्रिटन संसदेत गृहमंत्री पदाची शपथ घेतांना बौद्ध ग्रंथ “धम्मपदाला” साक्षी […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या तुमचा राशीनुसार आजचा दिवस कसा असेल…

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे आणि पैशाच्या बाबतीत तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. आजचा दिवस काही खास व्यवस्था करण्यात घालवला जाईल. तुमचा भौतिक आणि सांसारिक दृष्टिकोन आज बदलू शकतो. आज तुम्ही पैशाच्या बाबतीत खूप आनंदी असाल. फक्त त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा ज्यात तुम्हाला यश मिळेल. तुमचा स्वाभिमान वाढेल. वृषभ: आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भाजप नेत्याच्या फॉर्म हाऊसवर बारा वर्षीय बालिकेवर बलात्कार

शिक्रापुर (शेरखान शेख): शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या बड्या नेत्याच्या फार्म हाऊस वर एका बारा वर्षीय बालिकेवर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली असुन शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे विशाल दामोदर गायकवाड या नराधम युवकावर गुन्हे दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या […]

अधिक वाचा..

मोसंबी उत्पादकांना मिळणार दिलासा, येत्या ८ दिवसांत होणार नुकसानीचे पंचनामे…

जालना: जालना जिल्ह्यातील मोसंबी बागायतदारांच्या बुरशीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या ८ दिवसांत करण्याचे निर्देश नुकतेच जालना जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी दिले. यामुळे नुकसानग्रस्त मोसंबी बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार असून यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विविध महत्त्वाच्या प्रश्नांबाबत जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. जालना जिल्ह्यातील बागायतदारांच्या […]

अधिक वाचा..

शिंदे गटाने प्रथम न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दयावे: अंबादास दानवे

जालना: देशाच्या सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला ‘तुम्ही कोण आहात’ असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे त्यांनी आधी त्या प्रश्नाचे उत्तर दयावे, त्यानंतर इतर प्रश्नांचा निकाल लागेल. शिवसेनेचा आणि निवडणुकांचा धसका घेतल्याने त्यांनी रिट याचिका दाखल केली असल्याची सडकून टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर केली. जालना येथे ते माध्यमांशी बोलत होते. याशिवाय शिंदे गटाने […]

अधिक वाचा..