शिरुर तालुक्यात वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन युवतींची सुधार गृहात रवानगी शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील एका लॉजवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय वर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत दोघा युवतींसह लॉज चालकाला ताब्यात घेतले असून तिघांवर गुन्हे दाखल करत दोघी युवतींची महिला सुधार गृहात रवानगी केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथे असलेल्या बालाजी लॉजवर […]

अधिक वाचा..

शिक्रापूरचा ऋषिकेश जाधव वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी सीए

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ऋषिकेश सतीश जाधव याने जिद्दीच्या जोरावर यश संपादित करत सिए परीक्षा उत्तीर्ण होत वयाच्या एकविसाव्या वर्षी चार्टर अकाऊंटंट बनण्याचा विक्रम केला असल्याने शिक्रापूर सह परिसरातून त्याचे कौतुक होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सर्वसामान्य कुटुंबातील ऋषिकेश जाधव याचे शिक्षण वाघोली येथील जेएसपीएम विद्यालयातून सुरु झाले. ऋषिकेशचे वडील उच्चशिक्षित असून खाजगी […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपले आजचे राशीभविष्य

मेष: आजचा दिवस तुम्हाला चांगले अनुभव देईल. आज तुमच्या चांगल्या कृतींमुळे तुमचा व तुमच्या कुटूंबाचा अभिमान वाढेल. तुमचे नाव मोठे होईल. तुम्हाला निर्णय क्षमतेचा फायदा देखील मिळेल. धार्मिक कार्यात अधिक रस असल्याने, कदाचित तुम्ही आज काही विधी पूर्ण करण्याचा विचार करु शकता. वृषभ: आज तुमचे मन आनंदित होईल. मुलाचे यश तसेच सर्वोत्कृष्ट आचरण पाहून तुम्हाला […]

अधिक वाचा..

Video: आमदार बाबुराव दौंडकर स्मारक समितीत दौंडकर कुटुंबाला स्थान द्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याचे पहिले आमदार तालुक्याचे सालकरी म्हणुन ओळखले जाणारे स्वर्गीय आमदार बाबुराव दौंडकर यांच्या कुटुंबातील व्यक्तीला आमदार बाबुराव स्मारक समितीमध्ये स्थान देण्यात यावे अशी मागणी करंजावणे ग्रामस्थांनी केली असुन आमदार बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे पदाधिकारी स्वर्गीय आमदार बाबुराव दौंडकर यांच्या कुटुंबीयांचा कुठल्याही प्रकारचा सन्मान न ठेवता त्यांचा वारंवार अपमान करत असते. […]

अधिक वाचा..
Crime

शिरुरच्या बोऱ्हाडे मळ्यात दरवाजाचे कुलूप उचकटून चोरी

शिक्रापूर: शिरुर (ता. शिरुर) येथील बोऱ्हाडे मळा येथे राहणारे सचिन उदार हे (दि. १७) जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास घरी आल्यानंतर दरवाजाचे कुलूप उचकटलेले तसेच घरातील सर्व साहित्य अस्थाव्यस्थ पडल्याचे सचिन यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटातील २५ हजार रुपये […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यात ठेकेदाराला खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीमध्ये ठेकेदाराला दमदाटी करत काम बंद करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे समीर हरगुडे या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील फुजीफिल्म सेरीकॉल इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये राकेश मराठे यांचा ठेका आहे, मराठे यांचे कंपनीमध्ये काम सुरु असताना समीर […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीतील बंधाऱ्यावरुन व्यक्ती गेला दुचाकीसह वाहून

शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यावरुन जाणारा एक व्यक्ती दुचाकी सह नदीच्या पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना (दि. १९) रोजी सकाळच्या सुमारास घडली असून दिवसभर शोध कार्य करुन देखील वाहून गेलेल्या व्यक्ती बाबतची काहीही माहिती मिळू शकली नसल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदी पात्रामध्ये मासेमारी करणारा एक व्यक्ती मासेमारी […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसाच्या संस्कार गावडेची नवोदय साठी निवड

शिक्रापूर: पिंपळे खालसा (ता. शिरुर) या महाराष्ट्रातील शिष्यवृत्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संस्कार अविनाश गावडे या विद्यार्थ्याची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली असून संस्कारच्या यशामुळे शाळेने यशाची परंपरा कायम राखली. संस्कार गावडे सह त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिक सुशीला माकर व दिनेश निघोजकर यांचा शालेय व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थ व शिक्षकांनी सन्मान केला. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी धुमाळ

शिक्रापूर: शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यावेळी शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी संभाजी धुमाळ तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक ज्येष्ठ माजी सैनिक शिवाजीराव कोहोकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी सैनिक संघटनेच्या शिरुर तालुकाध्यक्ष पदी संभाजी धुमाळ, […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आपल्या दिवसाची सुरुवात चांगली जाणार आहे. नोकरी किंवा कौटुंबिक आनंदासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज कामाच्या ठिकाणी प्रभाव असेल. आज मूड चांगला असेल, कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. आज तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा पुरेपूर फायदा मिळेल. चांगले पैसे मिळतील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. वृषभ: कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. तुमचे कठोर परिश्रम आणि […]

अधिक वाचा..