संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने संकष्ठी चतुर्थीचे औचित्य साधून पहाटे च्या सुमारास अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी दर्शानास खुले करण्यात आले. संकष्ट चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या. शनिवार (दि १६) रोजी संकष्ट चतुर्थी निमित्त पहाटे अभिषेक, […]

अधिक वाचा..

गुनाट येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या मृत्युमुखी

शिंदोडी (तेजस फडके): गुनाट (ता. शिरुर) येथील चिंचणी-गुनाट रोडवर असणाऱ्या गुणवंतवाडी येथील सोमनाथ दत्तात्रेय गिरमकर या शेतकऱ्याच्या दोन मेंढ्यावर रविवार (दि १७) रोजी पहाटे २:३० च्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या असुन या शेतकऱ्याचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. चासकमानचा कॅनॉल गुनाट येथुन जात असल्याने गावात जवळपास ८० टक्के उसाचे क्षेत्र झाले […]

अधिक वाचा..

विकास पाटील व निखिल रावडे यांना बहिर्जी नाईक पुरस्कार प्रदान

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेले पोलिस नाईक विकास पाटील व पोलीस शिपाई निखिल रावडे यांना नुकताच पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते बहिर्जी नाईक हा पुरस्कार प्रदान करत त्यांचा गौरव करण्यात आला आहे. शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशन मधील गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेले पोलिस […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील धोकादायक बंधाऱ्याची प्रशासनाकडून पाहणी

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील भैरवनाथ नगर जवळील वेळनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची तसेच संरक्षक कठड्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असून सदर ठिकाणी दुरुस्तीची मागणी नागरिक करत असताना प्रशासनाकडून नुकतीच येथील धोकादायक बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील भैरवनाथ नगर जवळील वेळनदीवरील बंधाऱ्याची मोठी दुरावस्था झाली होती. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

बातमीचा दणका; पुणे-नगर महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवले

कारेगाव (तेजस फडके): “कारेगाव येथे पुणे-नगर महामार्ग गेला खड्डयात” अशा आशयाची बातमी “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या बातमीची दखल घेत मुख्य चौकात असलेल्या या खड्डयात सिमेंट काँक्रेट टाकुन हे खड्डे बुजवले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त करत “शिरुर तालुका डॉट कॉम” चे आभार मानले आहेत. शिरुर तालुक्यात जुलै […]

अधिक वाचा..

आई वडिलांच्या वाढदिवसानिमित्त पलांडे कुटुंबियांचा अनोख उपक्रम

मुखईत पलांडे कुटुंबियांतील सदस्यांकडून आई वडिलांची सन्मान करत ग्रंथतुला शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील बबन पलांडे व रत्नाबाई पलांडे या दाम्पत्याने मोठ्या कष्टाने संसार उभा करत आपल्या मुलांना शिक्षण दिले. शिक्षणानंतर पलांडे दाम्पत्यांची मुले सध्या शिक्षक, आयकर आधिकारी, IPS व IAS अधिकारी अशा उच्च पदावर काम करत आहेत. ग्रामीण भागात अद्यापही एकत्र कुटुंब पद्धत असून […]

अधिक वाचा..
Bhima river

आरणगाव- वडगाव बांडेतील भीमा नदीवरील पूल पाण्याखाली

नदीच्या पुराने दोन तालुक्यांचा संपर्क दोन दिवसापासून तुटला शिक्रापूर: आरणगाव (ता. शिरुर) येथील वडगाव बांडे ता. दौंड या गावाच्या मध्यभागी असलेल्या भीमा नदीला सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पूर आलेला असल्याने येथील भीमा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने येथील नागरिकांच्या दळणवळण चा प्रश्न निर्माण झाला आहे. आरणगाव (ता. शिरुर) येथील भीमा नदीवर बंधारा असून सध्या सुरु […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

पुणे नगर महामार्गावर प्रवाशाचे सव्वा तीन लाख लांबवले

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन बसमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचे ३ लाख ३० हजार रुपये अज्ञात महिलेने लांबवले असल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अहमदनगर येथून प्रवास करत पुणे येथे राजाराम गुलाखे येत असताना त्यांनी त्यांच्या जवळील पिशवीमध्ये ३ लाख ३० हजार रुपये […]

अधिक वाचा..

शेअर बाजार निर्देशांकात भरीव वाढ…

मुंबई: डॉलर वधारत असल्यामुळे आणि रुपया घसरत असल्यामुळे गेल्या ६ महिन्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक बऱ्याच खालच्या पातळीवर आले आहेत. आता मात्र परदेशी संस्थागत गुंतवणूक दारांनी विक्री थांबवून काही प्रमाणात खरेदी सुरु केल्याचे वातावरण बाजारात आहे. काल या गुंतवणूकदारांनी 309 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महिलेचा विनयभंग करत पतीला मारहाण

शाळकरी मुलाच्या अंगावर पाणी उडाल्याने घडला प्रकार शिक्रापूर: आरणगाव (ता. शिरुर) येथील एका महिलेचा मुलगा शाळेत जात असताना सुभाष कोकाटे या व्यक्तीकडून त्याच्या अंगावर पाणी उडाले. त्यामुळे शाळकरी मुलगा कोकाटे यांना काहीतरी म्हणाला. त्यामुळे सुभाष कोकाटे सह त्याच्या चुलत भावाने शाळकरी मुलाच्या घरी जाऊन मुलाच्या आईसह वडिलांना शिवीगाळ दमदाटी करत मारहाण करुन महिलेचा विनयभंग केल्याची […]

अधिक वाचा..