शिंदोडी येथील जनाबाई दुर्गे यांचे निधन

शिंदोडी (प्रतिनिधी) येथील जनाबाई ज्ञानदेव दुर्गे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, मुलगी, जावई, नातवंडे, असा परीवार आहे. शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष विठ्ठल दुर्गे यांच्या त्या मातोश्री होत.  

अधिक वाचा..

शिंदोडी विकासोच्या वतीने सभासदांना ८ लाख ७१ हजारांचा लाभांश वाटप

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सभासदांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि विश्वासार्ह ठरत असुन आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये संस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे संस्थेने सभासदांना एकूण ८ लाख ७१ हजार ७९६ रुपयांचा लाभांश जाहीर करत तो लाभांश सभासदांच्या खात्यात वितरित करण्यात आला. हा लाभांश संस्थेचे संस्थापक व संचालक आणि शिंदोडी गावचे माजी […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथे ४ लाख ५० हजारांचा डाळिंब माल चोरीला; तालुक्यातील तिसरी घटना

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावातुन एका शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल ४५०० किलो वजनाचा अंदाजे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा डाळिंबाचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिंदोडी येथील शेतकरी शहाजी तुकाराम वाळुंज (वय ५०) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक ०१ जुलै २०२५ ते ०२ जुलै २०२५ […]

अधिक वाचा..

शिरुर महसुलच्या अजब अधिकाऱ्यांचा गजब कारभार; आधी पंचनामा नंतर अज्ञात माती चोरांविरोधात फिर्याद…?

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तहसीलदार कार्यालयाच्या सावळ्या गोंधळाबाबत अनेकवेळा प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना तहसीलचा दुसरा एक अजब कारभार समोर आला आहे. शिंदोडी गावात अवैध माती उपशाबाबत तलाठी अलिशा महाकाल यांनी आधी पंचनामा केला. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी मातीचोरी केल्याची शिरुर पोलिस स्टेशन येथे मंडल अधिकारी संपत खरात यांनी तक्रार दाखल केली.   अ‍ॅड विनायक लक्ष्मण फडके […]

अधिक वाचा..

शिरुर; क्रिकेट स्पर्धेत बक्षिसे देण्याचे आश्वासन पण बक्षीसाची रक्कम देण्यास मात्र टाळाटाळ

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या अनेक गावात क्रिकेटच्या स्पर्धेची रणधुमाळी चालु आहे. शिरुर तालुक्यातील पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असणारे अनेक राजकीय पुढारी या क्रिकेट स्पर्धेसाठी रोख रक्कम किंवा इतर बक्षीसे जाहीर करत असतात. काहीजण ती बक्षिसे देतात. मात्र काहीजण बक्षीस जाहीर करुन नंतर ती बक्षिसे देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे आयोजक मात्र […]

अधिक वाचा..

पठ्यान आईला शब्द दिला…तुझ्यासाठी आता जिल्हा पातळीवरच पद आणणार अन शब्दच खरा केला…

शिंदोडी (तेजस फडके) सन २०२१ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याच्या आईचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाला. हा पराभव त्याच्यासहीत सगळ्यांनाच्याच मनाला चटका लाऊन गेला. पण भावानं आईला शब्द दिला. ‘आता गाव पातळीवर नाही लढायच…तुझ्यासाठी जिल्हा पातळीवरच पद आणणार’… अन पठ्यान दिलेला शब्दच खरा केला. सन २०२३ च्या राज्यसेवा परीक्षेत त्याची उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO) पदी […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथील दुर्गे कुटुंबियांनी ठेवला समाजापुढे आगळा वेगळा आदर्श…

शिंदोडी (तेजस फडके) आई-वडील स्वर्गवासी झाल्यानंतर तुम्ही कितीही पंचपक्वानाचं जेवण घातलं तरी ते पहायला आई-वडील नसतात. परंतु आई-वडील जिवंत असतानाचं त्यांना जीव लावा. त्यांना जपा, त्यांची सेवा करा. दुर्गे कुटुंबियांनी आईच्या अमृत महोत्सवानिमित्त जो अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला. त्याचा समाजातील इतर लोकांनीही आदर्श घ्यावा असे प्रतिपादन ह भ प गोपीनाथ महाराज जरांगे यांनी केले.   […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथील क्रिकेट स्पर्धेत शिरुर, श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघाचा सहभाग

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात ओम साई क्रिकेट क्लबच्या वतीने पहिल्यांदाचं ‘शिवशंभो चषक २०२५’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन गुरुवार (दि २४) रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत शिरुरसह श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघानी सहभाग घेतला आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात रात्री मतदारांनी रात्री उशिरापर्यंत बजावला मतदानाचा हक्क

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात आज (दि २०) रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडले. परंतु सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने शेतीची कामे सुरु असल्याने अनेक गावात मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाकडे पाठ फिरविली. परंतु दुपारनंतर मात्र मतदान केंद्रावर गर्दी केली. त्यामुळे प्रशासनावर ताण आल्याने मतदारांनी रात्री उशिरापर्यंत मतदानाचा हक्क बजावला. शिरुर तालुक्यातील अनेक गावात आज हिच परिस्थिती पहायला मिळाली. […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथील कुसुम नामदेव वाळुंज यांचे निधन

शिंदोडी:- येथील कुसुम नामदेव वाळुंज यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष नामदेव वाळुंज हे त्यांचे पती होत.

अधिक वाचा..