amol-kolhe

शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ.अमोल कोल्हे विजयी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून 1 लाख 57 हजार 467 मतांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना लाडू भरविण्यात आले. नेत्यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. मतमोजणीला आज (मंगळवार) सकाळी प्रारंभ झाला तेव्हा पहिल्या फेरीपासून डॉ. कोल्हे यांनी आघाडी घेण्यास […]

अधिक वाचा..
amol kolhe

अजित पवार म्हणाले, कसा निवडून येतो बघतोच; अमोल कोल्हे म्हणाले…

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे) : शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. तेराव्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांनी ५५,९४१ मतांची आघाडी मिळाली आहे. अजित पवार यांच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठा झटका मानला जात आहे. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केल्यानंतर कार्यकर्त्यांनी […]

अधिक वाचा..
pune-police-legs

Video: शिरूर तालुक्यातील युवकाकडून पोलिसाने घेतले पाय दाबून…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघाताची सगळ्या देशभरात चर्चा असताना त्याच कल्याणीनगरमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या पोलीस अधिकाऱ्याने चक्क शिरूर तालुक्यातील एका युवकाकडून पाय दाबून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. सणसवाडी परिसरातील काही युवक कारमधून पुण्यात घराकडे जात होते. रात्री 12.20 वाजता कल्याणीनगर परिसरात […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात महिलेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून मृत्यू…

शिक्रापूर: मुखई (ता. शिरूर) येथे दुचाकीत साडीचा पदर अडकून पडल्याचे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेणुका बाबुराव वोइंदे (वय २८, रा. धामारी, ता. शिरुर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे मृत महिलेच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धामारी येथील पाबळ-शिक्रापूर रस्त्याने बाबुराव वोइंदे व रेणुका वोइंदे हे दोघे त्यांच्या दुचाकीहून चालले […]

अधिक वाचा..
atul-patil

शिरूर तालुक्यात ऑनलाइन गेममधील नैराष्यातून आत्महत्या…

शिक्रापूरः शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा (वाडा पुनर्वसन) येथील एकाने ऑनलाईन गेमचे पैसे विडरॉल होत नसल्याने व उसने पैसे परत करता न आल्याने नैराश्यापोटी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील वाडा पुनर्वसन येथील एका ३५ वर्षीय तरुणाने ऑनलाईन गेमचे पैसे विडरॉल होत नसल्याने व मित्रांकडील उसने पैसे परत करता […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरीकांचे प्रश्नचिन्ह लागले ऊमटू…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह बेट भागात गेल्या दोन वर्षापासून विद्युत रोहीत्र चोरीचे सत्र सातत्याने सुरु असून या वर्षभरात तब्बल ३५०च्या वर विद्युत रोहित चोरीला गेले आहे. या आठवड्यात तब्बल १० विदयुत रोहीत्र चोरीला गेले असल्याची माहीती शिरुर महावितरणचे विद्युत उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी दिली. महावितरणचे व शेतकऱ्यांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले असून या […]

अधिक वाचा..
mahaganpati

संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगावला भाविकांची अलोट गर्दी…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी आज (रविवार) संकष्टी निमित्त अलोट गर्दी केली होती. संकष्टी निमित्त आज पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीने रांजणगावला अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले होते. […]

अधिक वाचा..
leopard-koregaon-bhima

कोरेगाव भीमा येथील फरशी ओढ्याजवळ बिबट्याने पळवला बोकड…

कोरेगाव भीमाः कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे फरशी ओढ्याजवळ पद्माकर देवराम ढेरंगे यांच्या गोठ्यावरील पूर्ण वाढ झालेल्या बोकडला सायंकाळी साडेसहा सातच्या सुमारास बिबट्याने झडप घालत उचलून नेत शिकार केल्याने कोरेगाव भीमा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरेगाव भीमा येथील फरची ओढ्याजवळ पद्माकर देवराम ढेरंगे यांचा गायांचा गोठा आहे. शेती कामासाठी एक महिन्यापूर्वी मराठवाड्यातील एक […]

अधिक वाचा..
RANJANGAON

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणातून युवकाचा खून…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात मित्राला केलेल्या शिवीगाळचा जाब विचारायला गेलेल्या युवकाला अज्ञात युवकांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे घडली आहे. आकाश प्रकाश पाडळे (वय २७, रा. सोनेसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत महेश रामदास शेळके (वय ३२, रा. […]

अधिक वाचा..
lonikand-traffic

लोणीकंद थेऊर फाटा वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा…

लोणीकंदः लोणीकंद (ता. हवेली) येथे थेऊर फाटा वळणाला कोरेगाव भीमा कडे येणाऱ्या बाजूला व रस्त्याच्या मध्यभागी बोरवेलची गाडी पलटी झाल्याने वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा लागून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. लोणीकंद येथील फाटा येथे बोअरवेलची गाडी पळली झाल्याने आज (गुरुवार) सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. सकाळची वेळ असल्याने कंपनी कामगार, कंपनीच्या गाडी, […]

अधिक वाचा..