arrest

शिरूर तालुक्यात युवकाचा खून; खुनी दोन तासात पोलिसांच्या ताब्यात…

शिरूर (अरुणकुमार मोटे): वडनेर (ता. शिरूर) येथे आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबिर खान (वय २२) या युवकाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. २४) सायंकाळी ६.३० च्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी शाहिद शरीफ बागवान (रा. जाम मोहल्ला, भुसावळ रेल्वे स्टेशन, ता. भुसावळ, जि. जळगाव) याला दोन तासात अटक केली आहे. वडनेर-फाकटे रोडवर वडनेर […]

अधिक वाचा..
helpata-book

‘हेलपाटा’ ही वंचीतांच्या संघर्षशील जीवनाचं वास्तव अधोरेखीत करणारी कादंबरी!

‘हेलपाटा’ ही तानाजी बबन धरणे (मु.आंबळे, ता.शिरूर, जि.पुणे) यांची वास्तव जीवनावर आधारीत ग्रामीण कादंबरी. लेखक ग्रामविकास अधिकारी म्हणून पं.स.रोहा,रायगड येथे कार्यरत आहेत. ते गीतकार, कवी,लेखक आहेत. त्यांची अनेक गीते यु ट्यूबवर आहेत. ‘शेताच्या बांधावर’, ‘सांजवेळ’, ‘सवप्नचित्र’ हे तीन कवितासंग्रह प्रकाशीत असून ‘चांदणं पेरीत जाऊ’ हा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ते अनेक पुरस्काराने सन्मानीत आहेत. ‘हेलपाटा’ ही […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

शिरुर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा…

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची स्थिती संदर्भात उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांकडून आढावा बैठकीत माहिती घेतली. उद्धव ठाकरेंकडून लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व लोकसभेच्या 48 जागांचा आढावा घेतला जात आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिरुर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना […]

अधिक वाचा..
kalgitura

नागपंचमीच्या दिवशी लोणीमध्ये कलंगीतुऱ्याचा कार्यक्रमाचे आयोजन…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे नागपंचमीच्या दिवशी दरवर्षी कलंगीतुऱ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी सोमवारी (ता. २१) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. कलंगी तुरा कार्यक्रमाची सुरुवात सन 1993 मध्ये झाली. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड, जुन्नर, पारनेर, हवेली आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोतेवर्ग उपस्थित राहतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम लोणी […]

अधिक वाचा..
sanaswadi-accident

पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू…

शिक्रापूरः पुणे-अहमदनगर महामार्गावरील सणसवाडी येथे बंद पडलेल्या कंटेनरला पाठी मागून धडकून टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथील पहाटे पावणे सहाच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. अपघातात टेम्पोच्या पुढील भागाच्या भाग तुटला असून पुढची कॅबिन पूर्णपणे तुटली आहे. याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गणपत महिपत कड (वय ५५, रा.नायगाव, ता. पुरंदर […]

अधिक वाचा..
Shirur-gold

शिरूर तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत सोनसाखळी केली परत…

रांजणगाव गणपतीः सामाजिक बांधिलकी जपत वृंदावन वॉशिंग सेंटर चे मालक सौरभ रघुनाथ पाचुंदकर यांनी हरवलेली सोनसाखळी परत केल्यामुळे आभार मानले आहेत. रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे दिनांक 7/8/2023 रोजी MH 12 5869 ही गाडी सायंकाळी साडेचार च्या सुमारास वृंदावन वॉशिंग सेंटर येथे पञकार अर्जुन शेळके हे गाडी वॉशिंग साठी देऊन साईटला थांबले होते. गाडी वॉशिंग […]

अधिक वाचा..
ST

शिरूर-पूर्व भागात एसटी गाड्यांचे वाजले बारा…

मांडवगण फराटा (संपत कारकूड): शिरूर तालुक्यातील पूर्व भागात पुरेशा आणि वेळेला एसटीची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बागाईत पट्टा म्हणून ओळखला जाणारा आणि शिरूर तालुक्यातील राजकारणात गेली अनेक वर्ष आपले राजकीय अस्तित्व टिकून या भागाला सुजलाम-सुफलाम करून विकासाच्या उंचीवर पोचलेल्या वडगाव रासाई – कुरुळी- मांडवगण फराटा व तांदळी- दरम्यानच्या पुरेशा आणि […]

अधिक वाचा..

लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीतील प्रकार; युवतीचे नग्न फोटो पाठवले नातेवाईकांना..

लोणीकंदः लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरुन एका युवकाने (वय २०) युवतीचे नग्न अवस्थेतील फोटो फिर्यादीच्या आईला आणि तिच्या नातेवाईकांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले. शिवाय, आरोपीने मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अर्जुन मोतीराम मुंडे (वय 32) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित […]

अधिक वाचा..
bahurupi-somnath-shinde

चला साहेब लोक आलेत बिन पगारी अन् फुल अधिकारी; लग्नाला चला…

शिरूर : अंगात खाकी वर्दी चढवून गावोगावी आपल्या चपखल शब्द आणि वाक्य रचनेतून लोकांना हसायला लावणारा बहुरूपी समाज आजही आपली परंपरा जोपासताना दिसत आहे. पण, काळाच्या ओघात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून बहुरूपी समाज अस्तित्वात आहे. शिवरायांच्या काळात गुप्त पद्धतीने माहिती मिळवण्याचे काम हा समाज करायचा. शिवरायांच्या काळात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील महिला स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात करणार आत्मदहन

शिरुर (तेजस फडके): शिक्रापुर येथे राहणाऱ्या एका महिलेची दौंड तालुक्यातील पेशाने वकिल असणाऱ्या व्यक्ती सोबत इंस्टाग्राम वर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्याच मैत्रीचा फायदा घेत या वकील महाशयांनी त्या महिलेच्या घरी जाणे-येणे सुरु ठेवले. त्यानंतर तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचे अश्लील फोटो काढत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा […]

अधिक वाचा..