shirur police

शिरूर पोलिसांची चरस व गांजा अंमली पदार्थ विक्री करणा-यांवर कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गांजा विक्री जोरदाररीत्या सुरु असल्याची वास्तववादी बातमी www.shirurtaluka.com ने मांडली होती. अनेक तरुण तरुणी या व्यसनाला बळी पडत असल्याचे वास्तव माडंले होते. शिरूर पोलिसांनी दोन ठिकाणी धडक कारवाई करत गांजा व चरस हे १, २७, व ०००रु. अमली पदार्थ जप्त केले आहे. शिरूर पोलिसांनी शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई गावामध्ये विमल […]

अधिक वाचा..
Satyawan Gajare

शिरूर तालुक्यात शेततळयात पडून बापलेकाचा दुर्देवी मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरूर) येथील शेततळ्यात पडून बापलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत ऋषिकेश दिगंबर झिंजाड यांनी आळेफाटा पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. राजवंश व पती सत्यवान यांना वाचवण्यासाठी उडी मारलेल्या आईला वाचविण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. जांबूत (पंचतळे) येथील बेल्हा-जेजूरी राज्य […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात विद्युत मोटारी, केबल चोरीचे सत्र सुरूच…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील इनामगाव, आण्णापूर, टाकळी हाजीसह बेट भागातील शेतकऱ्यांचे विद्युत कृषी पंप, केबल तसेच कृषी साहित्य चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस, कमी बाजार भाव त्यात विद्युत मोटारी, केबलची चोरी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शेतकरी हतबल झाल्याचे चित्र […]

अधिक वाचा..
Money

शिरुरमध्ये नागरीकांचे पैसे बुडवून पतसंस्थेचा अध्यक्ष फरार; ठेवीदारांची निदर्शने…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवहार ठप्प झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष अभय चोरडिया यांनी ठेवीदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या ठेवी एप्रिलमध्ये परत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याचे पालन न करता ते पुन्हा फरार झाले असून, त्यांच्यासोबत अन्य संचालक देखील फरार झाल्यामुळे ठेवीदार हवलदिल झाले आहेत. पतसंस्थेच्या दारात रोज जाऊन वाट पाहू लागले. […]

अधिक वाचा..
bharari-mahila-gramsabha

वाघाळे गावातील भरारी महिला ग्राम संघाचे उद्घाटन संपन्न!

वाघाळेः महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियाना अंतर्गत व महिला सशक्तिकरणासाठी स्थापन झालेल्या वाघाळे गावातील भरारी महिला ग्राम संघाचे उद्घाटन शनिवारी (ता. २९) संपन्न झाले. यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भरारी महिला ग्राम संघाला तीन लाख रुपये जमा झालेल्या cif निधीचे वाटप जिल्हा परिषद सदस्य व श्री महागणपती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष स्वाती पाचुंदकर, वाघाळे गावच्या […]

अधिक वाचा..
Onion

पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे नुकसान…

टाकळी हाजी (अरुणकुमार मोटे): मीना शाखा कालवाच्या टेल ला असलेल्या शिरूर तालुक्यातील म्हसे गावच्या तळ्यात पाणी सुरू असताना कॅनॉलची नादुरुस्ती तसेच अधिकाऱ्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पाणी शेतात घुसले. यामध्ये म्हसे येथील शेतकरी निळू चोरे, रवी सदाफुले, विशाल ज्ञानेश्वर चोरे यांच्या शेतातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निळू चोरे यांच्या शेतातील कांद्याची काढणी सुरू असून […]

अधिक वाचा..
pune lcb

शिरूर तालुक्यातून मोटारी चोरी करणारे चेन्नईमधून ताब्यात…

शिरूर (तेजस फडके): स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणने आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चेन्नई येथून जप्त करत तीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर शहरातून मागील चार महिन्यात स्विफ्ट व डिझायर कार चोरीचे पाच गुन्हे दाखल झाले […]

अधिक वाचा..
Mathadi

माथाडीच्या नावाखाली बोगस पैसे उकळल्यास कायदेशीर कारवाई: उद्योगमंत्री

रांजणगाव गणपती (तेजस फडके): माथाडी कायद्याप्रमाणे जे खरोखरच माथाडी आहेत. त्यांना न्याय देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असून, माथाडी कामगारांवर अन्याय होऊ नये. तसेच त्यांच्या कुटुंबावर अन्याय होऊ नये यासाठी सरकार काळजी घेत आहे. परंतु, माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून पैसे उकळणे ही चुकीची प्रवृत्ती असून जर माथाडीच्या नावाखाली माथाडीशी कसलाही संबंध नसलेल्या संघटना दादागिरी […]

अधिक वाचा..
Aasha Studyroom Shikrapur

शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी ‘आशा’चा पुढाकार!

शिक्रापूरः शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी शिक्रापूर येथे आशा स्पर्धा परिक्षा व व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका सुरू होत आहे. ‘आशा’ या अभ्यासिकेचे शनिवारी (ता. २२) मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ग्रामीण भागातच सर्व स्पर्धा परिक्षांचे (MPSC / UPSC) दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध व्हावे तसेच अभ्यासासाठी सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका उपलब्ध व्हावी या […]

अधिक वाचा..
vvm nimgaon mahalungi

निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…

शिक्रापूरः विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी या विद्यालयामध्ये इयत्ता १०वीच्या सन २००१-०२ या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा रविवारी (ता. १६) आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षकांसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्नेह मेळाव्यास विद्यालयाचे माजी प्राचार्य बाजीराव पडवळ सर, बाजीराव पुंडे सर, पवार डी. ए.सर, अर्जुन चव्हाण सर, विष्णू मुंजाळे सर अभिनव […]

अधिक वाचा..