police-vehicle

कोरेगाव भीमा परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप; वॉटर कॅनोन वाहन दाखल…

महाराष्ट्र

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १ जानेवारी २०२४ रोजी २०६ व्या अभिवादन सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून, या वर्षीच्या एक जानेवारी रोजीचा मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वांगीण तयारी करत आहे. कोरेगाव भीमा येथील बाजार मैदान व पुणे नगर महामार्गाच्या बाजूस वरुन वॉटर कॅनोन वाहन दाखल झाले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात एक जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमिवर यावर्षी देखील प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे. यावर्षीच्या मानवंदना कार्यक्रमास गर्दिचा उच्चांक होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नेहमीप्रमाणे कमालीची सतर्कता बाळगली आहे. कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. वरुन वॉटर कॅनोन वाहन तसेच इतर सामुग्रीसह राज्य राखीव दलाच्या काही तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

कोरेगाव भीमा येथे दाखल झालेल्या वरुन वॉटर कॅनोन वाहन वाहनातून शंभर ते सव्वाशे फुट उंच व लांब अंतरावर मोठ्या वेगाने पाण्याचे फवारे मारले जाते. त्यामुळे काही अडचण अथवा कायदा सुव्यवस्थेबाबत परिस्थिती निर्माण झाल्यास सदर वाहनातून पाण्याचा फवारा मारून गर्दी पांगविण्यासाठी वापर केला जातो. वरुन वज्र वाहनातील पाण्याच्या टाकीतील पाण्यामध्ये रंग टाकून वेगवेगळ्या रंगाचे पाणी या वाहनाद्वारे पाणी मारून जमाव पांगविण्यास मदत होते, तसेच उंचावर अथवा लांब लागलेली आग सदर वाहनाद्वारे आटोक्यात आणण्यास मदत होत असून, वरुन वॉटर कॅनोन वाहन कोरेगाव भीमा येथे तैनात करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाची जय्यत तयारी! पाहा सुविधा…

कोरेगाव भीमा! लाखो रुपयांच्या निधीची वापर होतो तरी कुठे?

कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमित्त पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने