करंदीच्या सरपंचपदी सोनाली ढोकले व उपसरपंचपदी पांडुरंग ढोकले बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता शिरूर) येथील सरपंच उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदी सोनाली ढोकले तर उपसरपंचपदी पांडुरंग ढोकले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. करंदी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत च्या सरपंच सुभद्रा ढोकले व उपसरपंच बबलू ढोकले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने नुकतीच सदर पदांची निवडणूक घेण्यात आली. […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत जुन्या वादातून युवकाला मारहाण…

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे नामदेव कांतीलाल भोरडे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील अक्षय भोरडे यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे. सदर शेतातील झाडेझुडपे तोडण्याच्या कारणावरून जून २०२१ मध्ये अक्षय भोरडे व […]

अधिक वाचा..

हुश्य! शिरूर पोलिस स्टेशनला आरोपी गजाआड करण्यात यश

शिरूर: शिरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. शिरूर हद्दीत मधील काही काळात मोठ्या प्रमाणात चोऱया झाल्यामुळे शिरूर पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होते. पण, एका चोरीप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या हद्दीमध्ये व शिरूर शहरात चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले होते. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जमिनीच्या वादातून तिघांना मारहाण

शिक्रापूर: रांजणगाव सांडस (ता. शिरुर) येथील मनोज गवळी यांची जमीन राजाराम रणदिवे यांनी खंडाने केलेली असून सदर जमीन राजाराम हे ट्रॅक्टर चालक उमेश शितोळे याच्या मदतीने नांगरत असताना संतोष गवळी व शांताराम गवळी हे दोघे तेथे आले त्यांनी हि जमीन आमची आहे आमचा भाऊ मनोजचा काहीही संबंध नाही, असे म्हणून ट्रॅक्टर चालक व रणदिवे यांना […]

अधिक वाचा..
Beaten

शिरूर तालुक्यात निवडणूकीच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी

शिरूर: शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथे काही दिवसांपुर्वी विकास सोसायटीची निवडणुक झाली होती. जय-पराजयामुळे विरोधात प्रचार केल्याच्या कारणामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून, दोन्ही गटाकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत फिर्यादी भाऊसाहेब भिकाजी (पानगे वय 36 वर्ष धंदा- शेती रा. निमगाव दुडे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी १) सागर वसंत रावडे, २) अरुण वसंत […]

अधिक वाचा..

Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

मेष: आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बर्‍याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो. वृषभ: आज घरात प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही एखाद्या प्रकल्पाच्या संशोधनावर काम करू शकता. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील रहस्यमय मृत्यू झालेल्या तीन अनोळखी प्रेतांचे गुढ कायम…

शिरूर: शिरूर तालुक्यातील रहस्यमय मृत्यू झालेल्या तीन अनोळखी प्रेतांचे शिरूर पोलिसांना अद्याप गुढ उकलेले नाही. शिरूर पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण झाला आहे. एक वर्षापुर्वी मलठण येथील शिंदेवाडीच्या दर्गामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झालेले प्रेत मिळाले होते. परंतु, अदयाप ही व्यक्ती कोण व तिचा मृत्यू कसा झाला याची अदयाप शिरूर पोलिसांकडून उकल होऊ […]

अधिक वाचा..
Sandeep Lawande

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी…

शिरूरः सुजल ड्रायक्लिनने काही दिवसातच ग्राहकांचा विश्वास संपादन करत यशस्वी भरारी घेतली आहे. कोंढापुरीसह शिरूर, शिक्रापूर आणि कोरेगाव भीमा येथे शाखा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनीचे डायरेक्टर संदीप लवांडे यांनी दिली. कोंढापुरी येथील कात्रज डेअरी शेजारी असलेल्या लवांडे वस्तीवर सुजल ड्रायक्लिनची सुरवात झाली. ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर शिरूर, शिक्रापूर आणि […]

अधिक वाचा..
Mahaganpati

श्री महागणपती: रांजणगाव गणपती

श्री महागणपती (रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) ः पुणे-नगर महामार्गावर पुणे-वाघोली-शिक्रापूरमार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे २१ किलोमीटरवर तर पुण्यापासून ५० किलोमीटरवर आहे. रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. मूळ मूर्तीला “महोत्कट’ असे नाव […]

अधिक वाचा..
Kawthe Yemai Mandir

कवठे येथील जाग्रुत देवस्थान ‘श्री येमाई देवी’

संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, आराध्यदैवत, कुलदैवत असणारे शिरुर (जिल्हा पुणे) तालुक्यातील शिरुर-मंचर रोड वर कवठे गावच्या दक्षिणेस असणारे श्री येमाई देवी देवस्थान एक जागृत देवस्थान असून, या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची मनातली इच्छा पुर्ण होत असल्याने भक्तगणांची नवस फेडण्यासाठी येथे नेहमीच गर्दी असते. कवठे गावास ऐतिहासिक वारसा ही लाभलेला असून गावाजवळून वाहणाऱ्या घोडनदीच्या किनारी […]

अधिक वाचा..