माजी सैनिकाची फसवणूक करणारे तिघे अटक

माजी सैनिक संघटनेच्या मोर्चा नंतर शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई शिक्रापूर (शेरखान शेख): वरुडे (ता. शिरुर) येथील एका माजी सैनिकाच्या पत्नीची जमीन खरेदीमध्ये लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडल्यानंतर गुन्हा अटक होत नसल्याने माजी सैनिकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी तातडीने सैनिक पत्नीची फसवणूक करणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली आहे. वरुडे (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

करडे येथील राजाराम जाधव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

शिरुर (तेजस फडके): करडे (ता.शिरुर) येथील राजाराम विठ्ठलl जाधव यांचे शुक्रवार (दि 13) हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे आई, पत्नी, २ मुले, ३ मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांचा एक मुलगा व सून सध्या युरोपमधील डेन्मार्क देशामध्ये नोकरीला असून, दुसरा मुलगा आणि एक जावई पुणे शहर पोलीस दलात नोकरीला आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर शहर व परिसरात दरोडा टाकून धुमाकूळ घालणारी टोळी गजाआड

दोन आरोपी अटकेत, पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी रांजणगाव गणपती (तेजस फडके) मागील दोन महिन्यांपासून रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतत दरोडा टाकून धुमाकुळ घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ऐवज जप्त केला असून ४ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. ग्रामीण पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आदेश लालकुश […]

अधिक वाचा..

चुकीच्या विजबिलांमुळे ग्राहक त्रस्त; नियमितपणे रीडिंग आकारणी करण्याची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): राज्यात विजेच्या प्रश्नासंदर्भात अनेक घडामोडी घडत असताना ग्राहकांचे चुकीच्या पद्धतीने रिडिंग घेत अथवा अंदाजे केली जाणारी रिडिंग व अवाजवी बिलांची आकारणी महावितरणकडून होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटी पद्धतीने विजेच्या मीटरचे रिडिंग आकारणी करण्यासाठी अनेक कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. मात्र प्रत्यक्षदर्शी जाऊन रिडिंग न […]

अधिक वाचा..

माझी मुंबई विकू नका, तिचं एटीएम करू नका…

मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ररअजय सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात आलेलं खोके सरकार हे फक्त मुंबई विरोधी नाही तर महाराष्ट्र विरोधी आहे. मुंबईचा वापर एटीएम म्हणून करत आहेत म्हणत माझी मुंबई विकू नका, तिचं एटीएम करू नका अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी ताकीद दिली. आदित्य […]

अधिक वाचा..

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी २०२५ पासून करा!

पुणे: लोकसेवा आयोगाने नुकतीच राजपत्रित अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोन साठीच्या मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला आहे. आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर वर्णनात्मक अर्थात लेखी परीक्षा करण्याचा असून याची अंमलबजावणी याच वर्षापासून म्हणजे २०२३ ला होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून करण्याचे ठरवले आहे. नवीन पद्धत आत्मसात करण्यास विद्यार्थ्यांना काही वेळ […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घ्यावा; गणेश फरताळे

शिक्रापूर (शेरखान शेख): विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वाटचाल करत असताना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ या महापुरुषांच्या आदर्श घ्यावा, असे मत शिवव्याख्याते गणेश फरताळे यांनी व्यक्त केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय युवा दिन विशेष कार्यक्रमात स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम दरम्यान बोलताना शिवव्याख्याते गणेश फरताळे […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभारच्या बालचामुंनी भरविला आठवडे बाजार

शालेय मुलांनी केली चक्क पन्नास हजारांची उलाढाल शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतच आठवडे बाजार भरवला होता तर यासाठी ग्रामस्थांसह अनेक मान्यवरांनी देखील मुलांना भेट देऊन चांगला प्रतिसाद देत मुलांचे कौतुक केले असून मुलांनी देखील या बाजारात चक्क 50 हजार रुपयांची उलाढाल केली आहे. हिवरे […]

अधिक वाचा..

विवेकानंदांचे तत्त्वज्ञान आम्हाला समजले नाही हे आमचे दुर्दैव…

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत संघटक रमेश टाकळकर यांचे मत शिक्रापूर (शेरखान शेख): ज्यांच्या श्रमावर देश उभा आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष नको, अठरापगड जातीची जनता त्यांच्याशी प्रकरणा नको असे तत्त्वज्ञान सांगणारे विवेकानंद आम्हाला समजले नाहीत हे आमचे विचार दारिद्र्यच असल्याचे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत सहसंघटक रमेश टाकळकर यांनी व्यक्त केले. […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या राऊतवाडीत बिबट्याचा वासरावर हल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडल्याने शेतकरी भयभीत झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी मधील सदाशिव राऊत हे त्यांची जनावरे गोठ्यात बांधून झोपलेले असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोठ्यातून कुत्रे भुंकण्याचा व गाय ओरडण्याचा […]

अधिक वाचा..