टीईटी घोटाळ्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक शिक्षा झाली पाहिजे: नाना पटोले 

मुंबई: टीईटी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर आमदार रमेश बोरनारे यांच्या मुलीचेही प्रमाणपत्र बोगस असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अशाप्रकारे किती जणांना अशा गैरमार्गाचा लाभ झाला, याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर सह तालुक्यात संतसेना महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील रामलिंग, मलठण, कवठे येमाई, टाकळी हाजी या ठिकाणी श्री. संत सेना महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवार (दि.२३) रोजी संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त रामलिंग रोडवरील शिक्षक काॅलनी येथील नाभिक समाजाचे संत सेना महाराज मंदिर परिसरात करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर […]

अधिक वाचा..

सविंदणे व कान्हूर मेसाई येथील पिण्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटणार…

नळ पाणीपुरवठा योजनेस तब्बल २४ कोटी ६१ लक्ष ५ हजार रुपयांचा निधी मंजूर सविंदने (अरुणकुमार मोटे): जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शिरुर तालुक्यातील मौजे कान्हूर मेसाई व सविंदणे या गावातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली असून तब्बल२४ कोटी ६१ लक्ष ५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कान्हूर मेसाई व सविंदणे प्रादेशिक नळ […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेल दर…

मुंबई: महागाईमधील चढ उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दर ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तुंच्या दरांवरही पडत असतो. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या आजचे दर काय आहेत. आजचा पेट्रोल […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार एसटी बसमधून मोफत प्रवास; कसा तो पहा…

मुंबई: देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास योजना लागू असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विधीमंडळाच्या समिती कक्षात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेसाठी ज्येष्ठांना प्रमाणपत्रांचे वितरण आणि योजनेचा […]

अधिक वाचा..

भुकेने मरणारे लोक हे चिंतेची बाब, केंद्राने आत्मपरीक्षण करण्याची गरज: अंबादास दानवे

मुंबई: देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आपण “हर घर तिरंगा” मोहीम हाती घेतली होती. मात्र ही मोहीम हाती घेताना आपल्या देशात अंबानी अदानी सारखे अब्जाधीश लोक राहतात. त्याप्रमाणे हजारो लोक हे भुकेने मरत आहे ही चिंतेची बाब असून या परिस्थितीचा विचार केला पाहिजे, अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारला टोला लगावताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वातंत्राच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ऑनलाईन अश्लील चॅटिंगमुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड

शिरुर (तेजस फडके) सध्याच्या युगात माणुस दिवसभर उपाशी राहील. पण दिवसभर मोबाईलशिवाय राहू शकत नाही. तसेच मोबाईल हि हौस नसुन गरज झाली आहे. आज लहान मुलांपासुन वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच मोबाईलचं व्यसन लागलं आहे. त्यात तरुणपिढी तर या सोशल मीडियावर फारच ऍक्टिव्ह असते. परंतु मोबाईलचे काही फिचर माहित नसल्याने किंवा चुकीचे अँप वापरुन ऑनलाईन व्हिडीओ सेक्स […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापूर परिसरात दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात चोरी: गुन्हे दाखल 

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी येथे एका घराचा पाठीमागील बाजूचा दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाजेवाडी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी येथे राहणारे रामदास मांजरे काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. […]

अधिक वाचा..

गणेशोत्सव सार्वजनिक उपक्रमांनी साजरा करा: यशवंत गवारी

शिक्रापूर हद्दीतील गणेश मंडळ व पदाधिकारी व नागरिकांना मार्गदर्शन शिक्रापूर (शेरखान शेख): तब्बल 2 वर्षांनी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असताना सर्वच गणेशोत्सव मंडळे तयारीला लागलेले आहेत.मात्र साजरा होणारा गणेशोत्सव शांततेत तसेच सार्वजनिक उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव […]

अधिक वाचा..

करंदी व चौफुला परिसरात बस चालू झाल्याने बसचे स्वागत…

विकास दरेकर व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांना यश शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) परिसरातील पुणे ते केंदूर ही गेली अनेक वर्षापासून सूरु असलेली पीएमपीएल बस सेवा तोट्याचे कारण सांगत बंद करण्यात आलेली असताना विकास दरेकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी बस सेवा सुरु करण्याबाबत पाठपुरावा केला असता अखेर आज पुन्हा बस सेवा सुरु झाल्याने या बसचे जल्लोषात […]

अधिक वाचा..