गुजर प्रशालेत प्रभात फेरी व रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांची हातात तिरंगा घेत प्रभातफेरी काढून प्रशालेत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे रक्षाबंधन देखील मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत रक्षाबंधनाच्या निमित्ताने तसेच स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त सर्व विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी […]

अधिक वाचा..

सामाजिक बांधिलकी जपत विशेष विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यां सोबत परिषद प्राथमिक शाळा भोंडवे वस्ती येथील विद्यार्थीनींनी रक्षाबंधन साजरे करत सामाजिक भान जपले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंडवे वस्ती येथील विद्यार्थीनींनी रक्षाबंधनच्या निमित्ताने भेट दिली. यावेळी सेवाधाम मधील विशेष विद्यार्थ्यांना औक्षण […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ‘हा’ रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे, दुभाजकांची दुरवस्था शिक्रापूर: शिक्रापूर चाकण हा राज्य महामार्गातील महत्वाचा महामार्ग क्रमांक ५५ चा रस्ता असून सदर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून कित्येक ठिकाणी दुभाजक जमीनदोस्त झाले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने वाहने उभी राहत असल्याने अपघातांची संख्या वाढली असून सदर रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात सापांच्या प्रजननामुळे काळजी घेणे गरजेचे

शिक्रापूर: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झालेले असताना सापांच्या प्रजननाचा देखील काळ असल्याने घोणस व नाग या विषारी सापांची पिल्ले घराच्या आजूबाजूला आलेली असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे. सध्या सापांच्या प्रजननाचा काळ असल्याने सापांच्या पिल्लांचा जन्म झालेला असून पाण्यामुळे सापांना निवारा नसल्यामुळे सापांसह सापाची पिल्ले निवाऱ्याच्या […]

अधिक वाचा..

शिरुरला फ्लॅटमधून दोन लॅपटॉप व टॅब चोरी

शिक्रापूर: शिरुर येथील BJ कॉर्नर येथील रेशम घाट बिल्डींगमध्ये राहणारे राकेशकुमार स्वाई यांचे त्यांच्या कामासाठी २ लॅपटॉप व टॅब वापरतात. नेहमीप्रमाणे त्यांनी ८ ऑगस्ट रोजी त्यांचे लॅपटॉप व टॅब घरातील टेबलवर ठेवलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास लॅपटॉप पाहत असताना त्यांना लॅपटॉप दिसले नाही. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता घरातील २ लॅपटॉप व १ टॅब […]

अधिक वाचा..

सणसवाडीतून डंपर वाहनाच्या बॅटऱ्या चोरी: गुन्हे दाखल

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथे वाहनांच्या बॅटऱ्या तसेच डिझेल चोरीच्या घटना वारंवार घडत असताना नागरिक हिराज झालेले असून नुकतेच येथील एका हॉटेल शेजारील पार्किंग मधून २ डंपरच्या ४ बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. डिंग्रजवाडी (ता. शिरुर) येथील कानिफनाथ गव्हाणे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापुरात दरवाजाचे कुलूप तोडून दागिने चोरी

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील फिनिक्स सोसायटी येथे राहणाऱ्या रुपाली टाक या ७ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी रुपाली या घरी आल्या असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील कपाट उघडे व साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी कपाटाची […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दाम्पत्याला मारहाण करत पोकलेनने घर भुईसपाट

न्यायालयाचे आदेश मोडीत काढत नुकसान केल्याचे चौघांवर गुन्हे शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे न्यायालयाने जागेबाबत मनाई आदेश दिलेले असताना देखील चौघांनी दाम्पत्याला मारहाण करत घराबाहेर काढून २ पोकलेनच्या सहाय्याने घर भुईसपाट केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रसाद कैलास धुमाळ, सुमन दत्तात्रय शिंदे, जितेंद्र दत्तात्रय शिंदे, प्रमिला उर्फ बायडी पाचर्णे या चौघांवर गुन्हे […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मेष: धंद्यातील येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांच्या मनावरील दडपण कमी होईल. कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व निर्माण कराल. नोकरदारांच्या बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. वृषभ: आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. विरोधकांना चहा पाजूनच आपला कार्यभाग साधून घेणे हिताचे राहील. आज जरा युक्तीने वागा. अति आक्रमकतेने नुकसान होईल. मिथुन: आज जोखमीची कामे टाळलेलीच बरी. जे काही कराल […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयाच्या प्रभारी तहसिलदारपदी प्रशांत पिसाळ

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात तत्कालीन तहसिलदार लैला शेख यांची भ्रष्टाचाराबाबत अनेक लेखी पुराव्यानिशी तक्रारी झाल्याने त्यांची तडकाफडकी बदली झाली होती. त्यांची अचानक बदली झाल्याने त्यांच्या जागेवर रंजना उंबरहंडे यांनी प्रभारी तहसिलदार म्हणुन पदभार घेतला होता. त्यांच्या काळात चार्ज घेतल्यापासून आजपर्यंत गौणखणिज केसेस, रस्ता केसेस, १५५ च्या चुक दुरुस्तीच्या केसेस, पुर्नवसन केसेस, वतन जमिनीच्या […]

अधिक वाचा..