महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी तेजस फडके तर उपाध्यक्षपदी सागर रोकडे

शिरुर (अरुणकुमार मोटे) समाजात पत्रकार म्हणुन काम करत असताना आपली आर्थिक बाजु पहिली भक्कम असली पाहिजे. पत्रकार म्हणुन आपण जर आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला तर आपण लाचारी स्वीकारली असा त्याचा अर्थ होतो आणि जो माणुस लाचार असतो तो निर्भीड पत्रकारिता करुच शकत नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ समीर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील वीजचोराला जिल्हा सत्र न्यायालयाचा दणका १ कोटी १५ लाख भरल्याशिवाय पुनर्जोडणी नाहीच

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथे थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट केबल जोडून होणाऱ्या वीजचोरीचा महावितरणने ऑगस्ट-२०२३ मध्ये ड्रोनच्या सहाय्याने पर्दाफाश केला होता. याबाबत महावितरणतर्फे केडगाव पोलिसांत मुकेश अगरवाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत वीजपुरवठा बंद केला. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने वीजचोरीच्या दंडातील ७५ टक्के म्हणजेच १ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात 22 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांची सभा

शिरुर (तेजस फडके) मुंबई येथे मराठा आरक्षण संदर्भात आंदोलन करण्यासाठी मराठा आरक्षण क्रांतीयोध्दे मनोज जरांगे पाटील हे शिरुर मार्गे मुंबई येथे जाणार असून शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे सोमवार दि २२ जानेवारी 2024 रोजी मनोज जरांगे पाटील याचा मुक्काम व जाहीर सभा होणार आहे. त्याच्या नियोजनाबाबत सकल मराठा समाजाची न्हावरा फाटा (ता . शिरुर) येथील कानिफनाथ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दारु पिण्याच्या वादातून झोपेलेल्या पत्नीचा गळा आवळून खून

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील फलके मळ्यात दारु पिण्याच्या वादातून झोपलेल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली असुन याबाबत विकाश अर्जुन गौड (वय 38) रा. फलकेमळा, कारेगाव, ता.शिरुर, जि.पुणे मुळ रा. सुनावल ता. हुंडम जि.जबलपुर राज्य मध्यप्रदेश यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली असुन पोलिसांनी आरोपीस तातडीने […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त व्यसनमुक्तीचा संदेश

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आपले आरोग्य खूप महत्वाचे आहे. यासाठी ते जपले पाहिजे तुम्ही सर्व महिलांनी मिस्री,तंबाखू यासारखे व्यसन सोडले तर हा मकरसंक्रांतीचा दिवस सार्थक ठरला असे आम्हाला वाटेल असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केले. रामलिंग येथील भिल्ल वस्ती येथे तेथील महिलांसोबत मकरसंक्रांत साजरी करण्यात आली. यावेळी स्त्रियांनी संकुचित […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही नावासाठी काम करत नाही. तर आम्ही समाजाचे काहीतरी देणे लागतो यासाठी काम करत आहोत. आम्हीपण रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले असून शाळेतील या मुलांना कोणतीही मदत लागली तर आम्ही निश्चितच ती करु विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद जयंती साजरी करतानाच त्यांचा […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये पिस्तुल मधुन फायरींग करणाऱ्या आरोपीना बारा तासाच्या आत अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर मध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी पिस्तुल मधुन फायरींग करत दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील तीन आरोपीना गुन्हा घडल्यापासुन बारा तासाच्या आत शिरुर पोलिसांनी अटक करत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.   शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 13 जानेवारी 2024 रोजी रात्री 11:35 ते 11:50 च्या दरम्यान शिरुर गावच्या हददीत आर. के. हॉटेल समोर पुणे-अहमदनगर […]

अधिक वाचा..

शिरुर येथील रामलिंग येथे एका विवाहित महिलेची आत्महत्या; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर रामलिंग येथील जाधव मळ्यात सलोनी रोहित शेळके या 38 वर्षीय महिलेने राहत्या घरातील फॅनला फाशी घेवून आत्महत्या केली असुन याबाबत तिची आई गितांजली युवराज आयरेकर (वय 38) रा.भोईराज सोसायटी, प्लॉट नं 23 अ, जाधववाडी, मार्केट यार्डसमोर ता.करवीर जि.कोल्हापुर यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असल्याने मयत महिलेचा पती रोहित आण्णासाहेब […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जुन्या वादातून एकास मारहाण; उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जुन्या वादातून दोन जणांनी एका व्यक्तीस बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत आधी शिरुर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याला अहमदनगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा (दि 14) रोजी मृत्यू झाला असुन याप्रकरणी संतोष रभाजी मोहीते आणि राहुल रभाजी मोहीते दोघे (रा.चव्हाणवाडी, […]

अधिक वाचा..

कारेगाव येथे दिशा फाउंडेशन आणि महारोजगार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे उद्या बुधवार दि 10 जानेवारी 2024 रोजी दिशा फाउंडेशन, महारोजगार, ई-कन्सलटन्ट आणि Z 24 न्युज यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिशा फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष संतोष सातकर यांनी दिली.   या मेळाव्यात शिरुर तालुक्यातील नामांकित कंपन्या सहभागी होणार […]

अधिक वाचा..