शिरुर शहर तसेच तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) तालुका महिला कार्यकारणी जाहीर

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) राष्ट्रवादी काँग्रेस शिरुर शहर तसेच तालुक्यातील महिला कार्यकारणीची नुकतीच निवड करण्यात आली. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते यावेळी सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी शिरुर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी डॉ स्मिता कवाद, उपाध्यक्षपदी तृप्ती जोशी, शितल शर्मा, राणी शिंदे, छाया हारदे, मोहिनी मांढरे, सरचिटणीसपदी जयश्री थेऊरकर, सरचिटणीसपदी दिपाली आंबरे, शिरुर शहर […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र शासनाच्या ‘मुद्रांक शुल्क अभय’ योजनेचा लाभ घ्या; अनिल जगताप

शिरुर (अरुणकुमार मोटे) शासनाने दि 1 जानेवारी 1980 ते दि 31डिसेंबर 2020 या कालावधीतील निष्पादित (सही केलेला) केलेले नोंदणीकृत व अनोंदणीकृत दस्तऐवजांसाठी मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना जाहिर केली आहे. सदर योजनेचा संबंधित सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिरुरचे दुय्यम निबधंक अनिल जगताप यांनी केले आहे.   यामध्ये सर्व प्रकारचे दस्तऐवज खरेदीखत, विक्री […]

अधिक वाचा..

आई-वडील शेतात अन मुल बैलगाडा घाटात ग्रामीण भागातील चित्र…

शिरुर (सुनिल जिते) ग्रामीण भागात सध्या बैलगाडा हंगाम सुरु झाला असून कुटुंबातील आई-वडील शेतीच्या कामात, तर मुले बैलगाडा घाटात असे चित्र दिसून येत आहे. तसेच गावोगावी भरवल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धाना लाखो रुपयाची बक्षिसे ठेवली जात असल्याने शाळेला दांडी मारुन विद्यार्थी क्रिकेटस्पर्धेत भाग घेत आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली […]

अधिक वाचा..

कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी कारेगावच्या फरार सोनारास अटक करत 91 तोळे सोन्याचे दागीने केले जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील ‘महादेव ज्वेलर्स’ नावाने ज्वेलरीचे दुकान चालविणारा सोनार प्रताप परमार याने परिसरातील ब-याचशा नागरीकांकडुन सोने गहाण ठेवण्यासाठी सोन्याचे दागीने दुरुस्त करण्यासाठी मोडण्यासाठी तसेच नवीन सोने खरेदीसाठी पैसे घेवुन सोन्याच्या दागीन्यांचा अपहार करुन नागरिकांची फसवणुक करुन पळुन गेला होता. याबाबत रांजणगाव MIDC पोलिस पोलीस स्टेशनला ऑक्टोबर […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीस स्टेशनचा लाचखोर सहाय्यक फौजदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशनमधील सहाय्यक फौजदार राजेंद्र दगडू गवारे यांना १० हजाराची लाच घेताना लाललुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. गवारे यांच्यावर काही दिवसांपुर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाली झाली होती. दिर्घ सुट्टीनंतर ते हजर झाले होते. मागील दोन वर्षापुर्वीच्या दाखल गुन्ह्यातील तपास करत असताना त्यांना पैसे कमविण्याचा मोह आवरला नाही.   त्यांनी तक्रारदाराकडे ५० […]

अधिक वाचा..

गुनाट येथे आज पासुन अखंड हरीनाम सप्ताह

शिंदोडी (तेजस फडके) गुनाट (ता. शिरुर) येथे आज बुधवार (दि 20) डिसेंबर ते 27 दरम्यान अखंड हरीनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह दरम्यान अखंड विना नामस्मरण, काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आणि जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या अखंड हरीनाम सप्ताहात […]

अधिक वाचा..

शिरुर येथे राष्ट्रवादीकडुन केंद्र सरकारच्या निषेधार्थ नायब तहसीलदारांना लेखी निवेदन

शिरुर (अरुणकुमार मोटे) कांदा पिकावरची निर्यात बंदी हटवावी आणि युवकांना रोजगार मिळावा या दोन गंभीर विषयावर संसदेच्या सभागृहामध्ये चर्चा व्हावी ही मागणी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे तसेच राज्यसभा खासदारांनी संसदेच्या सुरक्षतेचा विषय चर्चेस घ्यावा अशी मागणी केली होती. या मागणीमुळे केंद्र सरकारने खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यासह 148 […]

अधिक वाचा..

…अन शिरुरकरांच्या काळजाचा ठोकाचं चुकला…पण ती दंगल नव्हे तर…

शिरुर (अरुणकुमार मोटे) सकाळचे ठिक अकरा वाजलेले… अजुनही वातावरणात गारवा जाणवत होता…शिरुर शहराच्या गजबजलेल्या बसस्थानकाच्या आवारात अचानक काही जणांचा जमाव रस्त्यावर उतरुन रस्ता अडवतो…दोन गटात अपघातावरुन वाद होतो आणि हे दोन्ही गट आपआपसात भिडतात. एकमेकांवर दगड भिरकावतात. त्यानंतर काही क्षणातच पोलीसांचा ताफा सायरनचा आवाज करीत दाखल होतो. सुचना आणि अश्रुधूराचा वापर करीत पोलीस दंगल सदृश्य […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथे नागरिकांना दिवसा बिबट्याचे दर्शन…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढतं असुन सध्या तालुक्यातील विविध भागात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत आहे. आज (दि 18) डिंग्रजवाडी (ता.शिरुर) येथे दुपारी दोनच्या सुमारास शेतकऱ्यांना बिबट्या दिसला असून येथे पाच ते सहा बिबट्यांचा वावर असल्याचे नागरिकांनी सांगितले. हे बिबटया येथील मोकाट कुत्र्यांची शिकार करत आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून तातडीने पिंजरा बसवण्यात […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीस स्टेशनला तत्पर सेवेमुळे २०२३ चा विशेष गौरव पुरस्कार

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना कमी वेळेमध्ये जलदगतीने तप्तर सेवा दिल्याने पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते शिरुरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांना नुकताच विशेष गौरव पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात आले.   ऑक्टोबर २०२३ मध्ये नागरिकांच्या मदतीकरिता उपलब्ध असलेल्या डायल ११२ या हेल्पलाईन नंबर वर पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये […]

अधिक वाचा..