रांजणगाव गणपती येथे दारुड्यांचा धिंगाणा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीची फोडली काच

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील लांडे वस्तीनजीक असलेल्या कावळे विहिर परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भाडेकरुच्या चारचाकी गाडीची काच दोन दारुड्यानी फोडली असुन काच का फोडली याचा जाब विचारायला गेलेल्या मालकाच्या नातेवाईकाला मारहाण करुन त्याच्याही दुचाकीचे नुकसान केल्याची गंभीर घटना घडली आहे. तसेच ज्या दोन व्यक्तींनी गाडीचे नुकसान केले त्यांचा त्याच परिसरात अनधिकृत […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे उद्या मॅरेथॉनचा थरार, सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर मुख्य आकर्षण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे गेल्या पाच वर्षापासून आर एम धारिवाल फाउंडेशन तसेच महागणपती फाऊंडेशन यांच्या माध्यमातून “रांजणगाव मॅरेथॉन” ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. यंदा या स्पर्धेचे सहावे वर्ष असुन उद्या (दि 17) डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता स्पर्धा सुरु होणार असून सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर या स्पर्धेच मुख्य […]

अधिक वाचा..

तीस वर्षांपूर्वीच्या वर्गमित्रांकडून सेवापुर्ती निमित्त माजी सैनिक बांधवांचा सत्कार

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) चिंचोली मोराची (ता. शिरुर) येथे विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई येथील एस. एस.सी. गोल्डन बॅच 1993 तर्फे 93 च्या बॅचमधील निवृत्त सैनिक सुभेदार दत्तात्रय ननवरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त चिंचोली मोराची येथे सुभेदार संतोष नाणेकर यांच्या श्री महाळसाकांत पर्यटन स्थळावर सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी 1993 च्या बॅचमधील माजी दत्तात्रय ननवरे, कैलास शेडगे, […]

अधिक वाचा..

काळा पैसा कमवायचा वाळू माफियांनी घातलाय घाट, पण त्यामुळे रस्त्याची मात्र लागतीये वाट

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात चिंचणी येथील घोड धरणात शासनाने धरणाची खोली वाढावी यासाठी वाळूचा लिलाव केला. परंतु वाळू ठेकेदारापेक्षा वाळू चोरणाऱ्या वाळू माफियांनाच याचा जास्त फायदा होताना दिसत आहे. कारण वाळू ठेक्याच्या नावाखाली वाळू माफिया मोठया प्रमाणात रात्रीच्या वेळेस अनधिकृतरीत्या बेकायदेशीर वाळू उपसा करत असुन चोरुन ती वाळू विकत आहेत. परंतु त्यामुळे पुर्व भागातील […]

अधिक वाचा..

रांजणगावचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण आणि पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांना बहिर्जी नाईक पुरस्कार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीचा खून करुन आरोपी घटनास्थळावरुन पळुन गेला होता. तसेच हा आरोपी खून केल्यानंतर मिळेल तेथे मजुर अड्ड्यांवर काम करत होता. तसेच तो मोबाईल वापरत नसल्याने आरोपीचा शोध घेण्याचे रांजणगाव पोलीसांसमोर मोठे अव्हान निर्माण झाले होते. त्यावेळेस पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी वेषांतर करत हडपसर येथील […]

अधिक वाचा..

घोड धरणातून चोरुन वाळू वाहतुक करणाऱ्या गाड्यांवर तहसीलदारांची कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातील वाळू उपसा करण्यासाठी शासनाने रीतसर लिलाव केला. परंतु चिंचणी आणि निमोणे येथील वाळू डेपोतुन सर्वसामान्य लोकांना वाळू मिळत नसल्याचा मुद्दा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गाजल्यानंतर शिरुर येथील महसूल खात्याला खडबडून जाग आली. त्यानंतर शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि शिरुर पोलिसांनी आज (दि 15) रोजी पहाटे निमोणे येथे […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने मासिक बाल संगोपन निधी मिळण्याबात निवेदन

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही नेहमीच महिलांच्या उन्नती साठी प्रयत्न करत असते. सन 2005 साली बाल संगोपन योजनेची सुरवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनाथ ,निराधार, बेघर व शारीरिक व्यंग किंवा इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी शासनाकडुन मासिक अनुदान दिले जाते. परंतु सध्या कोरोनानंतर हा निधी वेळेवर मिळत नसल्याच्या […]

अधिक वाचा..

सविंदणे येथे भव्य विज्ञान प्रदर्शन; विशेष प्राविण्याबद्दल वरद मोटे या विद्यार्थाला सन्मानपत्र

शिरुर (अरुणकुमार मोटे) सविंदणे (ता.शिरूर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री गुरूदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन, चित्रकला, पाककला, रांगोळी, वकृत्व, संगणक, कार्यानुभव इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.   या विज्ञान प्रदर्शनामध्ये सौर उर्जा, पाणी प्रदुषण, हवा प्रदुषण, पदार्थांमधील भेसळ ओळखणे, रोबोटिक्स प्रकल्प, […]

अधिक वाचा..

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीची विधानपरिषदेच्या नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात दखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात घोड धरणात झालेल्या वाळूच्या लिलावात अनेक त्रुटी असुन लिलावातील नियम व अटींचा भंग करत बेसुमार वाळू उपसा चालु असुन स्थानिक लोकांना वाळू मिळत नसल्याबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने वेळोवेळी ठाम भुमिका घेत निर्भीडपणे वार्तांकन करत आपली भुमिका स्पष्ट केली होती. याचे पडसाद थेट नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात उमटले असुन […]

अधिक वाचा..

मुलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने वेळीच उपाययोजना कराव्यात; विजय वडेट्टीवार 

नागपूर: नवी मुंबईत दोन विद्यार्थ्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटना गंभीर आहेत. यावरून मुलांना किती मानसिक तणाव आहे हे लक्षात येते. वाढती स्पर्धा, अभ्यासक्रमाचे ओझे अशा कारणांनी या आत्महत्या वाढत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. नवी मुबंईती दोन […]

अधिक वाचा..