ट्रान्सफॉर्मर जळालाय…महावितरणला फोन करुन कळवा

बारामती(प्रतिनिधी) ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. पण ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची खबर 1800 212 3435 किंवा 1800 233 3435 या टोल फ्री क्रमांकावर कळवावी किंवा मंडलस्तरावरील […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने पालावरच्या बाळ गोपाळांसोबत बालदिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कामाच्या शोधात, गावोगावी जाऊन तिथे पाल मांडून काम करत असतात. हि लोक जास्त दिवस एका ठिकाणी रहात नाही. त्यामुळे अशी मुल शिक्षण घेण्यापासून वंचित असतात. या मुलांना शिक्षण नसल्यामुळे बालदिन काय असतो हे माहित नसते रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने या मुलांना चॉकलेट, बिस्कीट, दिवाळी फराळ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कुऱ्हाडवाडी येथे महसुल विभागाच्या नाकावर टिच्चून रात्री बेकायदेशीर वाळू उपसा

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोडनदीतील वाळू उपसा करण्यासाठी शासनाने निमोणे आणि चिंचणी या दोन गावात वाळूडेपो उभारले. त्यासाठी शासनाने रीतसर वाळूचे टेंडर काढले. त्यानंतर वाळूउपसा चालुही झाला. परंतु सर्वसामान्य लोकांना 600 रुपये ब्रास प्रमाणे किती वाळू मिळाली हा संशोधनाचा विषय आहे. तसेच ठेकेदारांच्या व्यतिरिक्त कुऱ्हाडवाडी येथील स्थानिक वाळू माफिया महसुल विभागाच्या नाकावर टिच्चून रात्रीच्या […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने गरजुनां दिवाळी फराळ, कपडे तसेच मिठाई वाटप

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) दिवाळी हा सण सगळीकडेच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु समाजातील काही घटक असे आहेत की त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे दिवाळी सणाचा त्यांना आनंद घेता येत नाही. समाजात अनेक श्रीमंत व्यक्ती आहेत. या व्यक्तींनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून जिथे जमेल तिथे सहकार्य करुन या गरीब लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा […]

अधिक वाचा..

‘रांजणगाव’ मध्ये सत्ताधाऱ्यांच्या विजयापेक्षा विरोधकांच्या पराभवाचीच जास्त चर्चा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत तीन विरोधकांनी एकत्र येत ग्रामपंचायतवर विजय मिळवत सत्ता काबीज केली. रांजणगावातील प्रस्थापित पुढऱ्यांच्या विरोधात तरुणाईने दंड थोपटले आणि विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज दिली. त्यामुळे रांजणगाव मध्ये सत्ताधाऱ्यांच्या विजयापेक्षा विरोधकांच्या पराभवाचीच जास्त चर्चा सुरु आहे. रांजणगाव गणपती येथील ग्रामपंचायतच्या […]

अधिक वाचा..

‘आख्खा गाव नडला पण वाघ नाय पडला’ त्या बॅनरची रांजणगाव गणपती सह पंचंक्रोशीत चर्चा…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात नुकत्याच आठ ग्रामपंचायतच्या पंचंवार्षिक निवडणुका पार पडल्या. त्यात अनेक गावातील दिग्गजांचा पराभव झाला. यावेळेस प्रत्येक गावच्या निवडणुकीत तरुणाईने सक्रिय सहभाग घेत सोशल मिडिया तसेच प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देत अनेक गावात सत्ताधाऱ्यांना चारिमुंड्या चित करत अस्मान दाखवले. सध्या रांजणगाव गणपती येथे लावण्यात आलेल्या अशाच एका बॅनरची रांजणगाव पंचंक्रोशीसह तालुक्यात चर्चा […]

अधिक वाचा..

रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या “शिक्षणतज्ञ” पदी राणी कर्डीले

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले यांची “शिक्षणतज्ञ” म्हणुन निवड करण्यात आली. राणी कर्डीले या उच्चशिक्षित असुन त्यांचे शिक्षण BA Ded, BPED, MSW पर्यंत झालेले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम उल्लेखनीय आहे. त्या रामलिंग महीला उन्नती […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती निवडणुक निकालानंतर बापूसाहेब शिंदे यांनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) तीन दिग्गज विरोधक एकत्र आले आणि त्यांनी प्रशासनावर दबाव टाकत आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या पॅनलचे उमेदवार राहुल पवार यांना तडीपार करण्यासाठी मानसिंग पाचुंदकर यांने राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली. परंतु परंतु शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर हि गोष्ट घातली. त्यामुळे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव व कर्डेलवाडी येथे मतदान शांततेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि 5) मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेत पार पडली आहे. या निवडणुकीसाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असुन एकुण 85.27 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणुक निर्णय अधिका-यांनी सांगितले. रांजणगाव गणपती ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकुण नऊ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सरपंच पदासाठी अनुसुचित जाती […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात जमिनीलगत कापलेल्या विजेच्या खांबामुळे अपघाताचा धोका…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील ग्रामीण रुग्णालय ते निर्माण प्लाझा या रस्त्यावर शरद बँकेसमोर महावितरणच्या जमिनीलगत कापलेल्या विजेच्या खांबामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला असुन दिवसा तसेच रात्रीच्या वेळेस हा खांब न दिसल्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वी एक चारचाकी कार या खांबाला धडकल्यामुळे कारच्या पुढच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा […]

अधिक वाचा..