शिक्रापुरात पहाटे चोरी करणाऱ्यास युवकाने रंगेहात पकडले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कॉलनी मध्ये घराच्या बाहेरील धान्याचे पोते चोरून घेऊन जाणाऱ्यास सदर ठिकाणच्या नागरिकांनी शिताफीने पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले असून भूपेंद्र मुन्ना ठाकूर असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कॉलनी येथील लालासाहेब मोरे हे घरात झोपलेले असताना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कुत्रे भुंकण्याचा […]

अधिक वाचा..

टाकळी भिमात जुन्या वादातून युवकाला मारहाण; गुन्हा दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथे एका युवकाला जुन्या वादातून दारु पिऊन शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याच्या घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संतोष लोकरे या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील आकाश मोहिते व संतोष लोकरे यांचे यापूर्वी वाद झालेले आहेत. आकाश हा त्याच्या घरासमोरुन जात […]

अधिक वाचा..

शिक्रापूर चाकण रस्त्यावर युवकांनी बुजवले स्वखर्चाने खड्डे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने सध्याच्या वाहतूक कोंडीत अनेक अपघात होत असल्याने स्थानिक युवकांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपत रस्त्यावर खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवत आदर्श निर्माण केला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना खड्डे दिसत […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये दारु न पाजल्याने युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील एका युवकाने दारु नाही पाजली म्हणून सदर युवका सह त्याच्या भावाला मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे पिया उर्फ फिरोज बंडूभाई तांबोळी या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील संगमनाथ कनजे हा दुचाकीला पेट्रोल टाकण्यासाठी गेला असता त्याला तेथे फिरोज हा भेटला त्यावेळी […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या युवकांची मी शिक्रापूरकर ही अनोखी मोहीम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील अनेक युवकांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत मी शिक्रापूरकर हि मोहीम सुरु करुन सामाजिक कामांना सुरवात करत व्हाट्सअप ग्रुपचा चांगला वापर कसा करता येईल हा संदेश समाजाला देऊन आदर्श निर्माण केला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शंभर हून अधिक युवकांनी एकत्र शिक्रापूर समस्या व उपाय हा व्हाट्सअप ग्रुप […]

अधिक वाचा..

सणसवाडीत निवडणुकीच्या वादातून युवकाला जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीच्या वादातून एका युवकाने एकाला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी सोसायटीची निवडणूक पार पडली असून […]

अधिक वाचा..

बेट भागात बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरुर) येथील सचिन जोरी या तरुणाची बिबट हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गावातील शिस्तारवस्ती येथील मंगेश सुरेश चव्हाण (वय ३३) या तरुणावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. चव्हाण हे रात्री साडेबारा च्या दरम्यान कांद्याच्या रोपांना पाणी देऊन आपल्या दुचाकीवरुन घराकडे परतत असताना शिस्तार वस्ती येथील ओढ्यानाजिक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर […]

अधिक वाचा..

युवकांनी व्यवसायात उतरणे गरजेचे: नाथाभाऊ शेवाळे

शिक्रापूर (शेरखान शेख): युवकांनी व्यवसायात उतरून व्यवसायात चिकाटी व सातत्य ठेवल्यास नक्कीच लाभ होतो त्यामुळे युवकांनी व्यवसायात उभारी घेऊन व्यवसायातून मिळालेल्या पैशाचा सदुपयोग करावा, असे प्रतिपादन जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी केले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शरद टेमगिरे यांच्या क्लासिक टेलर्स या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे बोलत होते. यावेळी शिक्रापूरचे […]

अधिक वाचा..
Crime

पाबळमध्ये किरकोळ वादातून युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे एका युवकासोबत झालेल्या वादातून युवकाच्या भावाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वृषभ संजय गायकवाड या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील गणेश चौधरी व वृषभ गायकवाड या दोघांमध्ये मागील आठवड्यात वाद झाला होता. त्यामुळे वृषभ हा गणेशच्या घरी गेला. […]

अधिक वाचा..

पोलीस, अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांना सोयी-सुविधा पुरवा: एकनाथ शिंदे 

मुंबई: पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. देशसेवा करण्याच्या दृष्टीने पोलीस व अग्निवीर या सेवेत भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतात. त्यातील अनेक तरूण सर्वसामान्य गरीब […]

अधिक वाचा..