शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी बारहाते तर व्हाईस चेअरमनपदी शिंदे

शिरूर तालुका

शिक्रापूर: शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत सभासदांचा विश्वास संपादन होता तर गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पतसंस्थेच्या झालेल्या मासिक मीटिंगमध्ये पतसंस्थेच्या चेअरमनपदी म्हतारबा बारहाते तर व्हाईस चेअरमन पदी अंजली शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक पार पडल्यानंतर सदर पतसंस्थेची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. दरम्यान चेअरमन, व्हाईस चेअरमन, खजिनदार व मानद सचिव पदाची निवडणूक करण्यात आली. यावेळी चेअरमनपदी म्हतारबा बारहाते, व्हाईस चेअरमन पदी अंजली शिंदे, खजिनदारपदी चंद्रकांत खैरे तर मानद सचिवपदी संदीप थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पॅनल प्रमुख अनिल पलांडे, शिवाजीराव वाळके, मोहनराव थोरात, सोपानआबा धुमाळ यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

unique international school
unique international school

शिरुर तालुक्यातील बेट भागाला सभापतीपदाची संधी दिल्याबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी देखील सर्वांना शुभेच्छा दिल्या असून निवडी बद्दल सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले. तर निवडी बद्दल बोलताना सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शकपणे सभासद हिताचा कारभार यापुढेही चालू ठेवणार असल्याचे नवनिर्वाचिचेअरमन म्हातारबा बारहाते यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाजी पवार यांनी केले तर सखाराम फंड यांनी आभार मानले.