रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार मुस्ताक शेख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार मुस्ताक शेख यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली असुन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या हस्ते त्यांना हि पदोन्नती देण्यात आली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे, सुहास रोकडे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, माणिक काळकुटे, माऊली शिंदे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

मुस्ताक शेख यांनी शिरुर, दौंड, हवेली, चाकण आणि लोणी काळभोर, जिल्हा विशेष शाखा आणि सध्या ते रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. शेख यांनी पोलिस कॉन्स्टेबल म्हणुन नोकरीची सुरवात केली. त्यानंतर पोलिस हवालदार, सहायक फौजदार आणि आता पोलिस उपनिरीक्षक म्हणुन ते निवृत्त होणार आहेत. विशेष म्हणजे त्यांची शिरुर येथील रामलिंग महाराज, रांजणगाव येथील महागणपती तसेच ढोकसांगवी येथील ग्रामदैवत खंडोबा यांच्यावर त्यांची विशेष श्रद्धा आहे.