harin-pabal

शिरूर तालुक्यात पाण्याअभावी हरणाचा मृत्यू? पाणवठ्यांची गरज…

शिरूर तालुका

पाबळ (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई-खैरेनगर शिवारात रविवारी (ता. २) सकाळच्या सुमारास हरीण मृतावस्थेत आढळून आले. वनरक्षक हनुमंत कारकूड यांच्याशी गावातील सामाजिक प्राणीमित्रांनी संपर्क साधल्याने वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला.

राज्यात उन्हाळा सुरू झाला असून, शिरूर तालुक्यातील खैरेनगर, कान्हूर मेसाई शिवारातील जंगलातील झाडांना पालाही शिल्लक राहिलेला नाही. वन्यप्राण्यांची सावली, चारा व पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. वन विभागाने या भागात कुत्रीम पाणवठे तयार करणे गरजेचे होते. मात्र, या बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. पाण्याअभावीच हरणाचा मृत्यु झाला अशी येथील नागरिकांची चर्चा आहे.

शिरूर तालुक्यात वन व शेतीक्षेत्र विस्तारित असल्याने वन्य पशु पक्षांची संख्या देखील मोठी आहे. उन्हाळ्यातील जवळ येऊन ठेपलेला मार्च तसेच एप्रिल व मे महिन्यात कित्येक ठिकाणी पाण्याचा तुटवडा निर्माण होत असल्याने याचा फटका हा पशु पक्षांना बसू नये म्हणून शिरूर वन विभाग नेहमीच पुढाकार घेत असतो. तालुक्यात चिंचोली मोराची, पाबळ, मलठण, सोने सांगवी, कान्हूर मेसाई, खैरेनगर आदी ठिकाणी वनविभागामार्फत कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले असून, त्या ठिकाणी टँकर ने पाणी पुरवले जाते. त्यामुळे वन्यप्राणी,पशुपक्षांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली जाऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होत असते.

वनविभागाने निधी उपलब्ध करून पाबळ, कान्हूर मेसाई, खैरेनगर, चिंचोली मोराची, मिडगुलवाडी येथील डोंगरावर पाणवठे मध्ये पाणी टाकावे, अशी मागणी वन्य प्राणिमित्रांनी केली आहे.

शिरुर तालुक्यातील कुत्रीम पाणवठे वन्य जीवांना वरदान

शिरूर तालुक्यात घडली धक्कादायक घटना; युवक, युवतीला मारहाण करत केला सामूहिक बलात्कार…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीने केला मोठा दावा…

शिरूर तहसील कार्यालयाच्या पार्किंग मध्ये ‘महाराष्ट्र शासन’ पाटी लावून एका अधिकाऱ्याची खासगी गाडी आली थाटात अन…

शिरूर तालुक्यातील दोन महत्त्वाचे रस्ते अखेर खुले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा