शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असुन कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. वीस दिवसा पुर्वी शिरुर तालुक्यातील एका माजी पंचायत समिती सदस्यासह सहा जणांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली होती. याबाबत शिरुर पोलीस स्टेशनला सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील तीन आरोपीना शिरुर न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर त्यांचा जामीन मंजुर झाला. परंतु यातील चार आरोपीना अजुनही जामीन मंजुर झालेला नाही. यातील मुख्य आरोपी हा माजी पंचायत समिती सदस्य आहे. तसेच काही दिवसांपुर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात तो सहभागी झाला होता.
विशेष म्हणजे या महाशयांच मोठ्ठ राजकीय वजन आहे. त्यामुळेच शिरुर पोलिसांना या माजी पंचायत समिती सदस्याला अटक करण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिरुर तालुक्यात नक्की चाललंय काय…?
प्रत्येक हिंदी चित्रपटातील पोलिसांच्या तोंडी एक संवाद सतत ऐकायला मिळतो. ‘कानून के हात बहोत लंबे होते है’ परंतु सध्या शिरुर तालुक्यातील कायदा सुव्यवस्था पाहता “कानून के हाथ बहोत लंबे होते है, लेकिन राजनेताओंके वजह से कभी कभी बंधे होते है” असे म्हणायची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे. त्यामुळे आता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यावर काय निर्णय घेतात…? हे येणारा काळच ठरवेल.
आरोपी जोमात तपास अधिकारी कोमात…?
या घटनेचा तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शरद वारे यांच्याकडे असुन वीस दिवस उलटूनही त्यांना मुख्य आरोपी सापडलेला नाही. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या प्रतिनिधीने त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तपास अधिकारी वारे यांनी मात्र फोन उचलन्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा उघड झाला आहे.
कवठे येमाई प्रकरणात आरोपी असणाऱ्या माजी पंचायत समिती सदस्याचा आमचे कर्मचारी कसून शोध घेत आहेत. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही.
प्रशांत ढोले
उपविभाग अधिकारी, शिरुर
शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? पोलिसांना मलिदा मिळाला का…?
शिरूर भूमी अभिलेख विभागातील दिरंगाईवर कारवाई
भुमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांना मोजणी नकाशा मिळवण्यासाठी मारावे लागतात वारंवार हेलपाटे
शिरूरच्या भूमी अभिलेख कार्यालयात खुलेआम लाचखोरीचा सुळसुळाट; खाजगी कर्मचारी; साहेबांचा खास माणूस