DYSP ऑफिस जवळच हाकेच्या अंतरावर चाललाय वेश्या व्यवसाय ; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कारेगाव (तेजस फडके) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेली शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC म्हणजे अवैध धंद्याचा अड्डा झाला असुन रांजणगाव येथील उपविभागीय कार्यालयाच्या (DYSP Office) जवळच अगदी हाकेच्या अंतरावर खुलेआम देहविक्री करणाऱ्या महिला उभ्या राहत असल्याने कामगार महिलांची कुचंबना होत आहे.

शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव MIDC तसेच शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. या तिनही पोलिस स्टेशनवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय कार्यालय असतानाही तिन्ही पोलिस स्टेशनच्या हद्दीत मटका, गुटखा, वेश्या व्यवसाय फोफावला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

उपविभागीय कार्यालयाचे नेमके काम काय…? 

आपल्या विभागात कायदा, सुव्यवस्था आणि शांतता राखणे हे त्यांचे मुख्य काम आहे. उपविभागीय कार्यालयाच्या हद्दीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करणे. तसेच जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशानुसार, उपविभागातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर देखरेख करणे.

शिरुर तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात…?

शिरुर तालुक्यात शिरुर आणि शिक्रापुर हद्दीत सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. नुकताच शिक्रापुर येथे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वेश्या व्यवसायावर छापा मारला. कारेगाव येथे औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार असलेल्या यश इन चौकात उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या जवळच खुलेआम वेश्या व्यवसाय चालु आहे. त्यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखणे ज्यांचे काम आहे त्यांच्याच कार्यालयाजवळ यश इन चौक हा अवैध धंद्याचा अड्डा बनलेला असताना त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे अशी सगळीकडे सध्या दबक्या आवाजात चर्चा आहे.

शिरुर-चौफुला रस्त्यावरील अपघातात एकाचा मृत्यू; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

शिरसगाव काटा येथे घरफोडी; सुमारे २ लाख २० हजारांचे दागिने चोरीला

शिरूरचे पोलिस निरिक्षक कायदा पायदळी तुडवत व्हिआयपी लोकांची करतात पाठराखण, त्या खासदाराचा फोन आला अन्

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना भेटायचय; आत सोडणारा खाजगी व्यक्ती सांगतोय मोबाईल बाहेर ठेवा