ranjangaon-midc-police station

Video: शिरूर तालुक्यात स्वीट होममधील कामगाराला बेदम मारहाण…

क्राईम

शिरूर (तेजस फडके): समोसे देण्याच्या कारणावरुन झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना कारेगाव (ता. शिरूर) येथे घडली आहे. ‘आमच्या अगोदर दुसऱ्या व्यक्तीला समोसे का दिले…?’ असा जाब विचारत स्वीट होममध्ये काम करणाऱ्या कामगाराला मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कारेगाव येथील दोन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

राजू लाबुराम देवासी (वय २६, रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून ईश्वर रंगनाथ नवले आणि साई लक्ष्मण नवले दोघे (रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू देवासी हे कारेगाव येथील शिवशक्ती स्वीट होममध्ये मजुरीचे काम करतात. १३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास दोन्ही आरोपी स्वीट होममध्ये आले होते. त्यांनी समोसे घेण्यासाठी देवासी यांच्याकडे पैसे दिले होते. दुकानात आलेल्या दुसऱ्या एका ग्राहकाला देवासी यांनी समोसे दिले. याच कारणावरून आरोपींनी संताप व्यक्त करत, ‘आमच्या अगोदर दुसऱ्या व्यक्तीला समोसे का दिले…?’ असा जाब विचारला. त्यानंतर वाद वाढत जाऊन आरोपींनी देवासी यांना हाताने मारहाण केली. तसेच त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

एका अत्यंत किरकोळ कारणावरुन दुकानात काम करणाऱ्या कामगाराला मारहाण करण्यात आल्यामुळे परिसरात या घटनेची चर्चा सुरु आहे. ग्राहकांना वस्तू देण्याच्या क्रमासारख्या साध्या कारणावरून थेट मारहाण आणि दमदाटीपर्यंत मजल जात असल्याने अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिरूर! आमची पाइपलाइन तोडू नका असे सांगताच लाथाबुक्क्यांनी मारहाण…

शिरूर तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून मारहाण; दोन महिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल…

शिरुर तालुक्यात वादातून महिलेला मारहाण; दोघांविरोधात विनयभंगाची तक्रार

शिक्रापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाचालकांकडून प्रवाशाला बेदम मारहाण करत जबरी चोरी

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत