शिरुर तालुक्यातील शिंदेवाडी येथे बैलगाडा घाटात भावकीत तुंबंळ हाणामारी; एकाचा मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता.शिरुर) येथील शिंदेवाडी येथे रविवार (दि २८) रोजी खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत सुरु असताना बैलगाडा घाटातच भानुदास ज्ञानोबा शिंदे, ज्ञानोबा गोविंद शिंदे व संजय रखमा शिंदे या स्थानिक नागरीकांमध्ये पुर्वीच्या हाणामारीच्या वादातुन अचानक भांडण होऊन तुंबळ हाणामारी झाली. बैलगाडा घाटात झालेल्या मारहाणीत संजय रखमा शिंदे […]

अधिक वाचा..

भीषण अपघात; लोणीकंद-थेऊर रस्त्यावर अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक तर पाच जण जखमी…

वाघोली (प्रतिनिधी) लोणीकंद-थेऊर रस्त्यावर केसनंद हद्दीत जोगेश्वरी माता मंदिराच्या जवळ मालवाहू कंटेनर आणि इको कार गाडीचा भीषण अपघात झाला असुन या अपघातात इको गाडीचा चकनाचुर झाला असून दोन जण अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असुन पाच जण जखमी आहेत. लोणीकंद पोलीस व स्थानिक नागरिकांनी एक तास अथक प्रयत्न करुन जखमींना बाहेर बाहेर काढले […]

अधिक वाचा..

शिंदेवाडी येथे बैलगाडा प्रेमींची निराशा…भांडण झाल्याने शर्यती अर्ध्यातच बंद; एकजण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता. शिरुर) येथील शिंदेवाडी येथे आज रविवार (दि.२८) खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यती सुरु असताना बैलगाडा घाटातच स्थानिक नागरिकांमध्ये अचानक वादावादी झाल्याने शर्यती बंद करण्यात आल्या. या भांडणाचा बैलगाडा शर्यतीशी कुठलाही संबंध नसल्याचे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले.   शिंदेवाडी येथील स्थानिक दोन कुटुंबात ही वादावादी झाली असुन […]

अधिक वाचा..

शिक्रापुर येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पवयीन युवतीचा विनयभंग

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर (ता. शिरुर) येथे पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या १७ वर्षीय युवतीसोबत गेल्या तीन वर्षांपासुन मैत्रीचे संबंध प्रस्थापित करत वारंवार तिला मानसिक त्रास देत विनयभंग केल्याप्रकरणी सलीम पप्पु शेख (वय २१) रा.शिकापुर, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरोधात शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.   याबाबत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार […]

अधिक वाचा..

करडे परीसरात मध्यरात्री जाळला जातोय क्रॅप मधील अनावश्यक कचरा…

शिंदोडी (तेजस फडके) करडे-रांजणगाव गणपती अष्टविनायक महामार्गाच्या कडेला पडीक जमिनीत रात्रीच्या वेळेस भंगारा (क्रॅप) मधील अनावश्यक कचरा जाळला जात असुन त्या कचऱ्यामधुन निघणाऱ्या धुरामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायतने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.   करडे येथुन रांजणगाव गणपती येथे अष्टविनायक महामार्ग जातो. त्या महामार्गाच्या कडेला (दि 23) रोजी […]

अधिक वाचा..

तळेगाव-न्हावरे रोडवर नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली; दोघे जण गंभीर जखमी

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रोड (NH548D) वर न्हावरे दिशेने जाणारी भरधाव वेगात असलेली (हुंदाई आय 20) कार निमगाव फाट्याजवळ गलांडे फार्म हाऊस समोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटल्याची घटना दुपारी 4 सुमारास घडली आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की हि कार रस्त्यावर पासुन सुमारे शंभर […]

अधिक वाचा..

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळं ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची एवढी भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार अन जनतेतून येणार, असं सडेतोड उत्तर शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी विरोधकांना दिल. शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरु असताना, विरोधी उमेदवारांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..

हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा अन्यथा रस्त्यावर उतरु; वीज कर्मचारी संघटनांचा एल्गार

बारामती (प्रतिनिधी) किरकोळ वीजबिलाच्या कारणावरुन एका महिला वीज कर्मचाऱ्याचा खात्मा करणाऱ्या आरोपीचा बंदोबस्त करावा. तसेच भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी महावितरण प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. सर्व वीज उपकेंद्रांना व शाखा कार्यालयांना सुरक्षा रक्षक नेमावेत व दिवंगत रिंकू बनसोडे यांचा खटना जलदगती न्यायालयात चालवावा आदी मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, संघटना संयुक्त कृती समिती’ने प्रशासनाला […]

अधिक वाचा..

डॉ अमोल कोल्हे यांना आमच्या मतांची गरज नाही का…? शिंदोडी, गुनाट व चिंचणी ग्रामस्थांचा सवाल…?

शिरुर (तेजस फडके) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या कडक उन्हाळ्याबरोबरच निवडणुकीचे वातावरण तापले असुन डॉ अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काल (दि 25) रोजी शिरुरच्या पुर्वभागात डॉ अमोल कोल्हे यांचा प्रचार दौरा होता. त्यावेळी शिंदोडी, गुनाट आणि चिंचणी या गावात कोल्हे यांनी जाण टाळल त्यामुळे नाराज झालेल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये ‘ह्याला आम्ही पाडणार, गद्दारांना गाडणार’ असा मजकुर टाकत आढळराव यांच्या विरोधात बॅनरबाजी

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच विरोधी उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. आढळराव पाटील यांनी तिकिटासाठी शिवसेना (शिंदे गट) सोडत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्याने सर्वसामान्य लोक प्रचंड नाराज झाले आहेत. त्यामुळे शिरुर येथे आढळराव पाटील […]

अधिक वाचा..