renkai-mandir-echakewadi

शिरूर तालुक्यात चोरटयांनी केली मंदिरातच चोरी…

क्राईम

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागामध्ये विदयुत रोहित्र, विदयुत मोटारी चोऱ्यांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसून दररोज नित्यनेमाने या घटना घडत आहे.

शिरूर तालुक्यातील कवठे येमाईतील कवठे-सविंदणे रोडवरील इचकेवाडी येथील रेनकाई मंदिरात चोरटयांनी डल्ला मारला आहे. देवीची सोन्याची नथ, दानपेटीतील रक्कम, स्पीकर सेट असा अंदाजे तीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तसेच त्याच परिसरातील मुक्ताबाई मदीरांनजीक असणारे विदयुत रोहित्र फोडले आहे. या परिसरातील महिनाभरात आतापर्यंत तब्बल २० विदयुत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा लंपास केल्या असून महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे.

वारंवार होणाऱ्या विदयुत रोहित्र, शेतीपंपाच्या व शेतीपंपासाठी लागणाऱ्या केबल चोरीमुळे शेतकरी पुर्णपणे हताश झाले आहेत. सदर प्रकरणी चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन, महावितरण यांनी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. एकाच महिन्यात अचानक २०विदयुत रोहित्र चोरीला गेल्याने विद्युत रोहित्र वेळेत बसवणे महावितरणला अवघड बनले आहे. विद्युत रोहित्राची उपलब्धता नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताच आले नाही. विदयुत रोहित्राअभावी डोळयादेखत उभी पिके पाणी उपलब्ध असून देतान आल्याने जळून उध्वस्त होऊ लागली आहेत.

शिरूर तालुक्यात मुलीच्या अंगावरील गोधडी ओढून केला विनयभंग…

निमगाव म्हाळुंगीमधील शेतकऱयांना मंत्रालयात मोठे संबंध असल्याचे सांगून धमकी…

शिरुर तालुक्यात जुन्या भांडणाच्या रागापायी एका महिलेने दुसऱ्या महिलेवर केला ऍसिड हल्ला…

Video: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी…

टाकळी हाजी उपकेंद्राच्या परीसरात महीनाभरात तब्बल १५ विद्युत रोहीत्रांची चोरी

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!