गाईंचा मृत्यू हा अनपेक्षित अपघात!

घटना अतिशय दुर्दैवी, श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचा खुलासा… कोल्हापूर: श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरु असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सावा दरम्यान काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू हा अनपेक्षित अपघात आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे आम्ही जीवापाड सांभाळ करत असताना अचानक काही गाईंचा झालेला मृत्यू हा मनाला वेदना देणारी बाब आहे. कणेरी मठाच्या वतीने गेल्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात पानटपरीवर पानाचे पैसे दिले नाहीत म्हणत हाणामारी…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात पानटपरीवर पानाचे पैसे दिले नाहीत म्हणत लोखंडी पाईप, दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मलठण (ता. शिरूर) येथे विकास सुभाष बोडरे (वय २३ वर्षे ) याने पानटपरीवर खाल्लेल्या पानाचे पैसे दिले असतानाही पानाचे पैसे दिले नाहीत, पैसे दे असे म्हणत […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात गळफास घेऊन महीलेची आत्महत्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील सुरजनगर येथिल भाग्यश्री रामेश्वर दामुवाले (वय २७) या महीलेने राहत्या घरी हॉलमध्ये ओढणीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २०) रोजी रात्री ९ वाजल्याच्या सुमारास रामेश्वर दामुवाले व त्यांची पत्नी भाग्यश्री रामेश्वर दामुवाले हे जेवण ऊरकून घरातील बेडरूम मध्ये झोपण्यासाठी गेले होते. नंतर […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये ड्रील मशिनचा करंट लागून एकाचा मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथिल संग्राम हॉटेल येथिल पत्र्याच्या वरती ड्रील मशिनच्या सहाय्याने काम करत असताना ड्रील मशिनचा करंट लागून विक्रम राम ब्रिज राजभर (वय 32) रा. कारेगाव ,मूळ रा. मयारी कल्याणपुर ता. मधुबन जि. उत्तर प्रदेश हा कामगार मृत्यू पावला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २०) जानेवारी रोजी सायंकाळी ५ :१० वाजल्याच्या […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेत बाजार मैदानात खुलेआम दारुविक्री

तळीरामांच्या त्रासाने व्यावसायिक नागरिक व महिला त्रस्त शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील बाजार मैदान तेथे न्हावरा रोड लगत भर बाजार मैदानात खुलेआम दारुची विक्री होत असून येथील तळीरामांच्या त्रासाने जवळील व्यवसायिक व नागरिक त्रस्त झाले असून खुलेआम दारु विक्री होत असताना पोलिसांचा यावर वचक आहे कि नाही, असा सवाल उपस्थित केला जात […]

अधिक वाचा..

जातेगावच्या शेतकऱ्याला शासनाकडून मिळालेला सौर पंप चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी मिळालेला सौर उर्जेवर चालणारा सौर पंप चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील विजय खैरे यांना शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी सौर उर्जेवर चालणारा सौर पंप […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या उपसरपंचावर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे उपसरपंच विशाल पांडुरंग खरपुडे व वैभव पांडुरंग खरपुडे या दोघांवर एका महिलेकडून बिल्डींग मटेरियल खरेदी करुन तब्बल 5 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे उपसरपंच विशाल खरपुडे यांनी यापूर्वी छाया मोरे यांच्याकडून बांधकाम साठी लागणाऱ्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बापानेच केला नववीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा बापाने विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नराधम बापावर विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील नववीत शिक्षण घेणाऱ्या मुलीची आई कामावरून आलेली असताना मुलगी रडत असल्याने आईने रडण्याचे कारण विचारले असता तिने मी झोपल्यानंतर वडील जवळ […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत पती व सासऱ्याकडून महिलेला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे घरगुती वादातून एका महिलेच्या पती व सासऱ्याने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चंद्रकांत नारायण गवारे, कुणाल चंद्रकांत गवारे व धनश्री विजय गवारे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील कांचन गवारे यांचे घरगुती वाद झालेले असल्याने महिला माहेरी गेलेली […]

अधिक वाचा..