शिरुर नगरपरिषदेकडून थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व मिळकतदारांनी त्यांची घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी त्वरित भरुन सहकार्य करावे अन्यथा जप्तीची कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिरुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर यांनी दिला आहे. अधिनियमातील कलम 152 चे तरतुदीनुसार मालमत्तेची जप्ती करणे, थकबाकीदारांची नावे वर्तमान पत्रात तसेच चौकात फ्लेक्सवर प्रसिद्ध करणे,नळ कनेक्शन तोडणे […]

अधिक वाचा..

अनेकांना नाहक त्रास दिल्याने त्या पोलिस निरीक्षकाचे निलंबन…

सुप्यातील नागरीकांनी फटाके वाजवून केला आनंदोत्सव साजरा शिरुर (अरुणकुमार मोटे): महिलेस भर रस्त्यावर मारहाण तसेच अधिक नाजुक प्रकरणांमुळे बदनाम झालेल्या नगर – पुणे हायवेवरील सुपा. ता. पारनेर या पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नितिनकुमार निळकंठ गोकावे याचे निलंबन करुन राज्याच्या गृह विभागाने त्याच्या मुजोरीला लगाम लावला आहे. हा सगळा प्रकार टोल नाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने […]

अधिक वाचा..

कांदयाच्या कवडीमोल भावामुळे तहसिलदारांना शिवसेना, युवासेना, शेतकरीसेना यांच्या वतीने निवेदन…

शिरुर: शेतकऱ्यांच्या कांदयाला योग्य बाजार भाव नसल्याने सरकारने नुकसान भरपाई देवून नाफेडमार्फत कांदा खरेदी करावा यासाठी शिरुर तालुका शिवसेना, युवासेना, शेतकरीसेना यांच्या वतिने शिरुर तहसिल कार्यालय येथे अव्वल कारकुन निलेश घोडके यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील शेतकर्‍यांच्या कांद्याला योग्य भाव नसल्यामुळे शिरुर तालुक्यातील गरीब शेतकरी मोठया आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकारने […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातुन सुमारे 25 हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडांची चोरी 

शिरुर: शिरुर तालुक्यातील तर्डोबाची वाडी येथील जांभळी मळा येथुन 28 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान गट क्रमांक 1133 मधील 10 चंदनाच्या झाडांची चोरी झाली असुन त्यांची किंमत अंदाजे 25 हजार रुपये आहे. याबाबत संतोष बबनराव मोरे (वय 44 वर्षे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल केली आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस […]

अधिक वाचा..

धक्कादायक! शिरुर तालुक्यातील दहा वर्षीय मुलासह दोघांचा मृत्यू, पाच जण जखमी

शिरुर: पुणे -सातारा महामार्गावर बुधवारी मध्यरात्री झालेला अपघात दोघांसाठी जीवघेणा, तर 5 जणांच्या कुटुंबांसाठी खर्चिक ठरला. ट्रक व कारच्या धडकेत शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील कांचन चंद्रकांत वनशिवे, विरेंद्र चंद्रकांत वनशिवे या मायलेकांना आपला जीव गमवावा लागला. पारगाव येथे महामार्गावर ही घटना घडली. खंडाळा येथील एका दवाखान्यात या अपघातातील 5 जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले […]

अधिक वाचा..
RANJANGAON

इंस्टाग्रामवर तलवारीचे फोटो टाकुन दहशत करणाऱ्या दोन इंस्टाकिंगच्या रांजणगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या

शिरुर (तेजस फडके) कारेगाव परिसरात राहणाऱ्या दोन युवकांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळ्या पोज मध्ये धारधार तलवारीचे फोटो टाकुन दहशत पसरवत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडुन (दि 28) रोजी दुपारच्या सुमारास रांजणगाव MIDC पोलिसांना माहिती कळताच सदरच्या दोन्ही इंस्टाकिंग भाईंच्या विरोधात पोलिस हवालदार विलास आंबेकर आणि पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी फिर्याद दिली असल्याने गुन्हा दाखल करत […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC टप्पा क्रं 3 साठी करडे येथुन लाखों ब्रास मुरुमाची चोरी…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन महसूल विभागाचे वेगवेगळे कारनामे समोर येत असुन शिरुर महसूल विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचं “कुरणच” झालं आहे. गावातील कोतवाल ते तहसीलदारांपर्यंत सगळेच यात सामील असल्याने तक्रार तरी कोणाकडे करायची असा प्रश्न सर्वसामान्य व्यक्तींना पडत असुन “कुंपणचं शेत खातंय” या म्हणीचा प्रत्यय शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला येत आहे. […]

अधिक वाचा..

उद्योगपती स्व रसिकलाल धारिवाल यांच्या जयंती निमित्त 423 रक्त संकलित 

शिरुर (मुकुंद ढोबळे): उद्योगपती स्व.रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या जयंती निमित्त येथील शिरुर नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 423 रक्तदात्यांनी रक्तदान केले. स्व.रसिकभाऊ माणिकचंद धारिवाल यांच्या जयंतनिमित्त उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारिवाल मित्र मंडळ व मोरया जीम हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. उद्योगपती व शिरुर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल […]

अधिक वाचा..

आपली मातृभाषा जतन करणं गरजेचं विभावरी देव याचं प्रतिपादन

शिरुर (तेजस फडके) आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपली मातृभाषा ही मराठीच असुन आपल्या मातृभाषेत आपण आपल्या भावना सहजरीत्या व्यक्त करु शकतो. आज जागतिक पातळीवर जरी इंग्रजी भाषा सर्वाधिक प्रमाणात बोलली जात असेल तरीही लहानपणी मुलांना किमान पाहिली ते चौथी पर्यंत मातृभाषेतुनच शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या विभावरी देव यांनी व्यक्त केले. मराठी राजभाषा […]

अधिक वाचा..

दहशत माजवणाऱ्या किंग ऑफ शिक्रापूरला पोलिसांकडून ठोकल्या बेड्या…

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे धुमाळ (ता. शिरुर) येथे हातामध्ये कोयता घेऊन मी किंग ऑफ शिक्रापूर आहे असे म्हणून कोयता फिरवून दहशत माजवणाऱ्या किंग ऑफ शिक्रापूरला शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करत बेड्या ठोकल्या असून सुरज विष्णू शितोळे असे पोलिसांनी गुन्हे दाखल करत अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. पिंपळे धुमाळ (ता. शिरुर) येथे एक युवक हातामध्ये कोयता […]

अधिक वाचा..