शिरूर पंचायत समितीच्या गटविकास आधिकारीपदी महेश डोके प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभारी राज संपले

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीच्या गटविकास आधिकारीपदी महेश डोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिरूर पंचायत समितीमध्ये गेले वर्षभर प्रभारी राज होते. आता शिरूरला गटविकास आधिकारी मिळाल्याने नागरीकांची विविध कामे जलद गतीने मार्गी लागणार आहे. गटविकास आधिकारी महेश डोके यांनी यापुर्वी गडचिरोलीतील पंचायत समिती अहेरी, भामरागड तसेच अहमदनगर जिल्हयातील पंचायत समिती शेवगाव येथे अतिशय […]

अधिक वाचा..

शिरूर भूमी अभिलेखची कामे रिक्त पदांमुळे रखडली

शिरूर (तेजस फडके): शिरूर भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षकपदासह १० पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे तेथील कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून शासनाकडे ताबडतोब ही पदे भरण्याची मागणी करण्यात येत आहे. कार्यालयाला लवकर कर्मचारी न दिल्यास टाळे ठोकण्याचा इशारा सुनील जाधव व अविनाश घोगरे यांनी दिला आहे. येथे कमी असलेल्या कर्मचाऱ्यांचा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात चारचाकी गाडी अडवून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील तर्डोबाची वाडी येथील मयुर लॉन्स मंगल कार्यालयातील लग्न समारंभ उरकुन चारचाकी गाडीने घरी जात असताना दुचाकी गाडीवरुन आलेल्या तीन जणांनी चारचाकी गाडी अडवत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच चारचाकी गाडीवर दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्याने यात चारचाकी गाडीतील एकजण जखमी झाला असुन याबाबत दादाभाऊ महादेव घेगडे (वय 37) […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरात स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट व स्टोरी ठेवून दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने याबाबत रेहान असिफ काझी या युवकांवर शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहान असिफ काझी व इतर चार इतर अल्पवयीन मुलांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट व स्टोरी […]

अधिक वाचा..

पुण्यात महसूलच्या अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचे ‘घबाड’ ! पैसे मोजताना CBI च्या अधिकाऱ्यांची दमछाक

पुणे (प्रतिनिधी) पुण्यात अनेक अधिकारी लाच घेताना रंगेहाथ सापडले आहेत. नुकतेच वाघोली येथे तलाठी कार्यालयातील दोन मदतनीस यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातील महसूलचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना 8 लाखांची लाच घेताना शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर अनिल रामोड यांच्या पुण्यातील आणि नांदेड येथील घराची […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर पोलिसांकडुन अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल होईना, दबंग आधिकाऱ्याची शिरुर पोलिस स्टेशनला गरज…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथे रस्त्याच्या कडेला एक पेट्रोल टाकुन एक जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून पाच दिवसात तपास करुन त्यातील आरोपी पकडण्यासाठी शिक्रापूर पोलिस तसेच गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांना अथक परीश्रम करत यश आले आहे. नात्याला काळीमा फासणारी हि घटना घडली असुन मृताची बायको आणि अल्पवयीन मुलीने तिच्या प्रियकराच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील महिला वस्ती गृहांचे सुरक्षा ऑडीट व तपासणी करा अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी 

शिरुर (तेजस फडके): नुकतीच महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातील सावित्रीबाई फुले शासकीय महिला वस्ती गृहामध्ये एका मुलीचा बलात्कार करुन खून झाल्याची घटना घडलेली आहे. याच पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहे तसेच खासगी महिला वस्तीगृहे या मध्ये नियमानुसार सी सी टी वी, महिला सुरक्षा रक्षक, तक्रार पेटी आणि स्थानिक पोलीस स्टेशन चा नंबर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने विद्युत तारा व खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

शिरुर (तेजस फडके): शिरुर परीसरात काल गुरुवार (दि. 8) रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. सोने सांगवी, ढोकसांगवी, रांजणगाव, कारेगाव, फलके मळा, करंजावणे, गणेगाव परिसरात पावसाबरोबरचं वाऱ्यांचा जोर खुप होता. याबाबत कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी सांगितले की विजेचे खांब पडल्याने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. शिरुर तालुक्यात सूरु असलेल्या वादळी वाऱ्यामुळे […]

अधिक वाचा..

जमलच तर अंजनी ताई आम्हाला माफ कर…

शिरुर (तेजस फडके) इतकेच मला जातांना “सरणावर” कळले होते. मरणाने केली सुटका “जगण्याने” छळले होते असच काहीतरी अंजनी ताई यांच्या मनात असेल आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करावे, ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, आपले सर्वस्व अर्पण करावे ज्याला आपण पती म्हणून स्वीकारावा ज्याच्यासाठी समाजाची कसलीही परवा न करता त्याच्यावर प्रेम करावं समाजाने त्या प्रेमावर शिंतोडे उडवू नये. […]

अधिक वाचा..

निमोणे गावच्या आदर्श महिला सरपंच जिजाबाई दुर्गे यांना दिल्लीत आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने पुरस्कार

शिरुर (तेजस फडके) राष्ट्रीय पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे यांच्या संकल्पनेतून ५ जून रोजी दिल्ली येथे संस्थेचे मोठे अधिवेशन पार पडले. या समारंभात निमोणे गावच्या आदर्श सरपंच तथा पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिजाबाई सुरेश दुर्गे यांना समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. दिल्ली येथील हिंदी भवन […]

अधिक वाचा..