शिरूर भूमी अभिलेखची कामे रिक्त पदांमुळे रखडली

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (तेजस फडके): शिरूर भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षकपदासह १० पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे तेथील कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून शासनाकडे ताबडतोब ही पदे भरण्याची मागणी करण्यात येत आहे.

कार्यालयाला लवकर कर्मचारी न दिल्यास टाळे ठोकण्याचा इशारा सुनील जाधव व अविनाश घोगरे यांनी दिला आहे. येथे कमी असलेल्या कर्मचाऱ्यांचा फायदा घेऊन शिरूर भूमी कार्यालयात लिपिक अनेक खासगी व्यक्ती बिनधास्तपणे सरकारी खुर्चीत बसून सरकारी कागदपत्रे मोठ्या प्रमाणात हाताळत असून, नागरिकांची आर्थिक लूट करत आहेत. या

अपुऱ्या कर्मचाऱ्यांची दमछाक; झीरोंचा सुळसुळाट

कार्यालयात मोजणी होऊन जमा केलेली अनेक मोजणीची प्रकरणे नागरिकांना मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांमध्ये सतत वाद होत असल्याचे अॅड. सागर दरेकर यांनी सांगितले आहे.

ही पदे आहेत रिक्त…

भूमापक ३, दप्तर बंद १, 1, कनिष्ठ १, न. भू. लिपिक अभिलेख पाल १, १, प्रति लिपिक १, परीक्षण भूकरमापक १, उपअधीक्षक १ ही पदे रिक्त आहेत. तरी ती त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.