शिरुर तालुक्यातील त्या ग्रामपंचायतच्या गैरकारभाराची चौकशी करा…

सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) ग्रामपंचायत मध्ये सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाल्याचे माहिती अधिकारात उघड झालेले असून सदर गैरकारभाराची चौकशी करत ग्रामविकास अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी अहवाल येई पर्यंत प्रशासकाची नेमणूक करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे पाटील […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून पोल्ट्री कामगारांना बेदम मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख: जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका पोल्ट्रीवर जात पोल्ट्री कामगारांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक नागेश अनिल खळदकर, विक्रम खंडेराव उमाप, आबा खंडेराव उमाप यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील बबन उमाप यांच्या पोल्ट्री वरील कामगार […]

अधिक वाचा..

लिप्ट दिलेल्या कारचालकाने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग, पोस्कोसह इतर गुन्हे दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): गोलेगाव (ता. शिरुर) येथुन शिरुरला शाळेत जाण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीने एका अज्ञात कार चालकाला लिप्ट मागितल्याने ती कारमध्ये पुढच्या बाजूस बसली असता सदर कार कार चालकाने ‘तु आमच्या सोबत चल आम्ही तुला पैसे देवु ‘असे म्हणत तिच्या बरोबर अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याने त्या अज्ञात कारचालकाविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगासह बाललैगिंक […]

अधिक वाचा..

अखेर मंगलदास बांदल कारागृहाबाहेर…

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल हे पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी मागील बावीस महिन्यांपासून कारागृहात असताना त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्या नंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून अखेर आज सतरा फेब्रुवारी रोजी मंगलदास बांदल हे कारागृहाबाहेर आले असल्याने पुणे जिल्ह्यात त्यांच्या अनेक कार्यकर्ते […]

अधिक वाचा..

MEPL कंपनीबाबत येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडावा शेखर पाचुंदकर यांची दिलीप वळसेंकडे मागणी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हारो प्रायव्हेट लिमिटेड (MEPL) कंपनीच्या प्रदुषणामुळे निमगाव भोगी, कारेगाव, आण्णापुर, सरदवाडी, रामलिंग आणि शिरुर शहर येथील जमीनी नापिक झालेल्या आहेत. तसेच पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. यासंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी किंवा तारांकित […]

अधिक वाचा..

भोगवटा प्रमाणपत्र न घेता बेकायदेशीरपणे शिरुर बसस्थानक व दुकान गाळ्यांचा वापर सुरु

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानक व दुकान गाळयांचा वापर भोगवटा प्रमाणपत्र न घेता सुरू असल्याची लेखी तक्रार महिबुब जैनुद्दीन सय्यद, (उपाध्यक्ष म.न.से ,पुणे जिल्हा) यांनी सहआयुक्त नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचेकडे काही दिवसांपुर्वी केली होती. त्यानंतर सहआयुक्तांनी सदर प्रकरणी नियमानुसार उचित कार्यवाही करण्याबाबतचे आदेश शिरूर नगर परिषदेला दिले होते. शिरूर नगर परिषदेने शिरूर आगारप्रमुख […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांचा उच्छाद, खुणाच्या, चोरीच्या घटना उघडकीस येईना…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत खुणासह, बलात्कार, सोनसाखळी चोऱ्या, मंदीरातील चोऱ्या, शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, केबल, ठिबक सिंचन संच चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यातील अनेक गुन्हे अदयापपर्यंत उघडकीस आले नसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेला आरोपी अदयापपर्यंत फरार आहे. त्यामुळे शिरूर पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात त्या युवकाने कंपनीची तक्रार करत मागितली खंडणी अन…

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीला मानव विकास परिषदेचे लेटरहेड देत माहिती मागून नंतर कंपनीच्या एचआर मॅनेजरला धमकी देत खंडणी मागितल्याची घटना घडली असल्याने मानव विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर याच्या विरुद्ध खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील क्रोमवेल इंजिनिअरिंग या कंपनी […]

अधिक वाचा..

शिरुर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीचा अहवाल जाळून व्यक्त केला निषेध

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीने वेतन त्रुटीच्या बाबतीत शिफारशींत अन्याय केल्यामुळे बक्षी समितीचा अहवाल पंचायत समिती समोर जाळून कर्मचाऱ्यांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला. सातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी होत्या. त्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी बक्षी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा खंड दोनचा अहवाल प्रकाशित करण्यात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात डॉक्टर दांपत्याच्या भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावर डॉक्टर दांपत्याच्या कारला ट्रकची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉ. मच्छिंद्र नारायण खैरे हे गंभीर जखमी झाले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पवन भगवान साठे या ट्रकचालकावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..