RANJANGAON

पन्नास लाखांची खंडणी मागत शिरुर पंचायत समितीच्या माजी सभापतीला जीवे मारण्याची धमकी…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असुन गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत पन्नास लाखांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला असुन शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे यांना वाल्मिक चिमाजी फंड (रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, […]

अधिक वाचा..

माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि बाप्पुसाहेब शिंदे यांच्यामुळे कारेगावकरांना मिळाले रोहीत्र 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व युवासेना जिल्हा प्रमुख बापुसाहेब शिंदे यांच्या माध्यमातून कारेगाव येथील यश ईन चौक परिसरात तात्काळ विद्युत रोहिञ उपलब्ध झाले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्या सोनाली विकास नवले यांनी दिली. अतिरिक्त भारामुळे येथील विद्युत ट्रान्सफार्मर काही दिवसांपुर्वी जळाला होता. सहा दिवस ऐन उकाड्यात नागरिकांना […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या युवकाचा नदीत ढकलून खून…

आरोपीला चोवीस तासात अटक शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील न्हावरे येथे अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या आणि या अनैतिक संबंधाबाबत इतरांना सांगेल असे म्हणत वारंवार पैशाची मागणी करुन पैसे उकळत असणाऱ्या एका 19 वर्षीय युवकाला मुळा-मुठा नदीच्या पुलावर घेऊन जात नदीवरून ढकलून देऊन खून केल्याची धक्कादायक घटना घडली असुन यात नाना ऊर्फ विठ्ठल आण्णा कीर्तने या […]

अधिक वाचा..

जातीवाचक शिविगाळ व सरकारी कामात अडथळा आणणारा माजी उपसरपंच आरोपी अद्याप मोकाट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर येथील महीला तलाठी सुशिला गायकवाड यांना रमेश थोरात यांनी जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या ऑफिस मधील कागदपत्रे इकडे तिकडे फेकुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी, सरकारी कामात अडथळा अश्या कलमान्वये रमेश थोरात यांच्यावर गुन्हा दाखल होऊन 10 दिवस उलटूनही अदयाप शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक केले नाही. आरोपी शिक्रापूर परीसरामध्ये मोकाट फिरत […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये शासन आपल्या दारी उपक्रम राबवणार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी ” हे अभियान राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. सदर अभियान जिल्हाधिकारी पुणे व उपविभागीय अधिकारी, उपविभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुका स्तरावर शिरुर नगर परिषद हॉल मध्ये मंगळवार (दि.३०) मे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेमध्ये पार पडणार आहे. या सर्व […]

अधिक वाचा..
Anjali Gaikwad

अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणी 20 दिवस उलटूनही कारवाई नाहीच…

नातेवाईक तक्रार द्यायला पुढे न आल्याने फाईल बंद…? शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथील 33 वर्षीय अंजली गायकवाड या महिलेने सुसाईड नोट लिहीत (दि 8) मे रोजी फाशी घेऊन आत्महत्या केली होती. अंजली यांनी लिहिलेल्या सहा पानी सुसाईड नोटमध्ये रांजणगाव MIDC तील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचे नाव असताना मागील 20 दिवसात पोलिसांनी त्याला साधे चौकशीलाही […]

अधिक वाचा..
karde midc

‘राज’ आश्रय! करडे येथील MIDCच्या टप्पा क्रं 3 च्या मुरुमचोरी प्रकरणी तारीख पे तारीख…

शिरुर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक 3 करडे येथील गट क्रमांक 91, 92/1, 92/2, 93, 94/1, 94/2 मध्ये 14 नोव्हेंबर 2022 पासून कोणत्याही प्रकारची रॉयल्टी किंवा उत्खनन करण्याची परवानगी नसताना स्टेरीऑन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या मुरुम उपसा चालू आहे. संबंधित कंपनीस बेकायदेशीर मुरुम उत्खनन केल्याप्रकरणी एकुण 48 कोटी […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनला ‘सिंघम’ अधिकाऱ्याची गरज; नागरिकांमध्ये चर्चा…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असुन शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दोन ते तीन वर्षात मोठया प्रमाणात खून, दरोडे, मोटार सायकल चोरी, विद्युत मोटारीची चोरी, अवैध दारुविक्री, गुटखा, मटका, गोमास विक्री, लॉजिंग, वेश्या व्यवसाय चालु असुन शिरुर पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि अवैध व्यावसायिक यांच्यात “अर्थपुर्ण” संबंध असल्यामुळे कारवाईच्या आधीच संबधित अवैध धंद्यावाल्याना […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या ग्रामपंचायत सदस्यांना बडतर्फ करा…

सुधीर ढमढेरे यांची पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) ग्रामपंचायतच्या सात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांकडून कर वसुली सुरु केली. मात्र 2 वर्षा पासून 7 ग्रामपंचायत सदस्यांनी कराचा केला नसल्याचे उघड झाले असल्याने सदर 7 सदस्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरुन बडतर्फ करावे, अशी मागणी सुधीर ढमढेरे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याने तळेगाव […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावरील अपघात रोखण्यास उपाययोजना करा

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे प्रशासनास निर्देश शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे अहमदनगर महामार्गावरील वाढलेल्या रहदारीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी खराडी चौक ते शिरुर घोडनदी पूल या मार्गावर विविध उपाययोजना करण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. पुणे अहमदनगर महामार्ग हा पुणे जिल्ह्यासह अहमदनगर व मराठवाडा […]

अधिक वाचा..