आमदाबादच्या उपसरपंचपदी प्रदिप साळवे बिनविरोध

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरूर) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रदिप साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्पूर्वीचे उपसरपंच कांताराम नऱ्हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंचपद रिक्त झाले होते. यावेळी झालेल्या निवडणूक प्रक्रियेतून एकमेव प्रदिप साळवे यांचे नामनिर्देशन अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच लीला पवार यांनी काम […]

अधिक वाचा..

भुमी आभिलेख कार्यालयातील मोजणीची शेकडो प्रकरणे गायब

चूकार कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायदया अंतर्गत कारवाई करा; ऍड. सागर दरेकर शिरुर (अरुणकुमार मोटे): भुमि अभिलेख शिरूर कार्यालयाकडून गेल्या सात महीन्यापासून मोजणी होऊनही शेतकऱ्यांना क प्रत नकाशा उपलब्ध करून देण्यास अदयापही टाळाटाळ केली जात आहे. वरीष्ठ कार्यालयाकडे याबाबतची तक्रार करुन देखील दोषींवर अद्याप कारवाई होत नसल्याचे तक्रारदार ऍड. सागर दरेकर यांनी सांगितले आहे. अशा प्रकारचे […]

अधिक वाचा..

शिरूर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश रत्नपारखी यांची निवड 

शिरुर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई येथील रेशन दुकानदार व सामाजिक कार्यकर्ते गणेश माधव रत्नपारखी यांची शिरूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. शिरूर येथे पार पडलेल्या कार्यकारणीच्या मीटिंगमध्ये त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सचिव पदी संतोष सरोदे, सहसचिव पदी सचिन नरवडे यांची निवड करण्यात आली. तसेच नवीन कार्यकारणी मध्ये माळी डी. आर, […]

अधिक वाचा..
abdul-sattar-nitin-thorat

शिरूरच्या शिष्टमंडळाची शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा…

शिरूरः राष्ट्रीय किसान मजूर महासंघाच्या शिष्टमंडळांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून निवेदन दिले आहे, अशी माहिती राज्याचे उपाध्यक्ष नितीन थोरात यांनी दिली. सदर निवेदनात म्हटले आहे की, ‘शेतकऱ्यांना कृषीपंपाला विज पुरवठा रात्रीच्या वेळी करण्यात येत असल्याने पुरेशी झोप न मिळू शकल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. […]

अधिक वाचा..

तळेगावातील फडणवीस वाडा मोडकळीस; नागरिकांच्या जिवास धोका

तळेगाव ढमढेरे: शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे जीर्ण झालेला फडणवीस वाडा मोडकळीस आला असुन त्या वाड्याभोवती लोकवस्ती असल्याने वर्दळ असते. त्याचबरोबर मुख्य पेठेत जुनी इमारत झाली असल्याने नागरिकांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने एखादी अनुचित घटना घडली. तर या घटनेला जबाबदार कोण…? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे येथील […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपालिकेतील बेकायदेशीर बांधकाम व इतर प्रश्नांसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरु 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरामध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. येथील पांजरपोळ या ठिकाणचे वृक्ष तोड करून अमरधामाची भिंत तोडली आहे. तसेच सुभाष चौक या बाजारपेठेत अनाधिकृत बांधकामे मोठया प्रमाणावर केली आहे. या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. शिरुर हद्दीत बेकायदेशीर हॉटेल व्यवसायासाठी नगरपरिषदेने दिलेला वापर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कार्यकर्ते संभ्रमात, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथा-पालथ चालु असताना शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी “वेट अँड वॉच” ची भुमिका ठेवली आहे. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार हे सुरवातीला अजित पवार यांच्या सोबत होते. मात्र शपथविधी नंतर त्यांनी सावध पवित्रा घेत पुन्हा आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये तालुक्याचे […]

अधिक वाचा..
arun sakore sir

भैरवनाथ विद्याधाम प्रशालेतील शिक्षक अरुण साकोरे सेवानिवृत्त…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भैरवनाथ विद्याधाम प्रशाला या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक अरुण साकोरे हे 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले. निरोप समारंभाच्या वेळी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी विद्यार्थिनी परिसरातील ग्रामस्थ, नागरिकांची बहुसंख्य उपस्थिती होती. साकोरे सर हे ग्रामस्थ व संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात, गावच्या कार्यक्रमात […]

अधिक वाचा..
msn

शिरुरकरांनी भेसळ सरकार विरुद्ध केला संताप व्यक्त…

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या राजकिय घडामोडीवर शिरूर शहरामध्ये मनसेच्या वतीने संतापाची एक सही व लोकांचे मत यासाठी आज दि.८ जुलै रोजी सकाळी ११ वा. हुतात्मा स्मारक शिरुर येथे सहीची मोहीम हा कार्यक्रम चालू केला आहे. या मोहीमेला शिरूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी होत असताना दिसून येत होते. आपली एक संतापाची सही करुन […]

अधिक वाचा..

निर्वी येथे प्रहार अपंग क्रांती संस्थेचे अध्यक्ष राज्यमंञी बच्चु कडु यांचा वाढदिवस साजरा

शिरुर (तेजस फडके): प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंञी बच्चु कडु यांचा वाढदिवस शिरुर तालुक्यातील निर्वी येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रहार अपंग क्रांती संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव, पुणे जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष अनिता कदम, योगेश सोनवणे, मानसिंग पवार, संचालक संतोष […]

अधिक वाचा..