शिरुर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला वेगवेगळ्या संघटना आणि पक्षांचा पाठिंबा

शिरुर (तेजस फडके) जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकावर झालेल्या लाठीमाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिरुर येथील मराठा क्रांती मोर्चा शिरुर यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या शिरुर शहर बंदला मोठ्या प्रतिसाद मिळाला. सोमवार (दि 11)रोजी संपुर्ण बाजारपेठेतील व्यवहार बंद होते. शिरुर बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासुन शिरुर तहसिल कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला .त्यात मराठा बांधवासह, इतर […]

अधिक वाचा..
aayushaman-bharat-shirur

शिरुर तालुक्यातील कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली कानउघडणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) “आपण शासनाच्या आरोग्य सेवेत कार्यरत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची अडचण होणार नाही याची दक्षता घेतानाच रुग्णांना तत्पर व वेळेवर अत्यावश्यक रुग्ण सेवा द्या” अशा कडक शब्दात कवठे-येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ दामोदर मोरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ नामदेव पानगे यांनी कान उघडणी केली आहे. “कवठे-येमाई […]

अधिक वाचा..

जालन्यातील लाठीहल्याचा सणसवाडी ग्रामस्थांकडून निषेध

कोरेगाव भीमा (प्रतिनिधी) सणसवाडी (ता.शिरुर) ग्रामस्थांच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा बांधावांवर अमानुषपणे जो काठीहल्ला करण्यात आला त्याचा जाहीर निषेध करण्यात येऊन याबाबतचे निवेदन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना सरपंच सुवर्णा रामदास दरेकर व ग्रामस्थांनी दिले. यावेळी सणसवाडी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील सर्व ग्रामस्थ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सणसवाडी येथे गॅसचा स्फोट; जीवितहानी नाही, घरातील सर्व साहित्य जळून खाक

कोरेगाव भिमा (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील नरके वस्तीवर रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक गॅसचा भडका होऊन राजाराम दत्तात्रय नरके यांचे घर जळाले असून नुकतेच लग्न झालेल्या मुलाचा संसारोपयोगी वस्तू व लग्नाचा बस्ता यामध्ये जळाला असून नरके कुटुंबीयांशी आमदार अशोक पवार यांनी संवाद साधत कुटुंबीयांना धीर दिला असून काळजी करु नका. काही मदत लागल्यास कळवा आम्ही […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

रामलिंग महीला उन्नती बहु सामाजिक संस्था व अशोक बापू पवार मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा सन्मान  शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मुलांना शिक्षण हे मातृभाषेतून द्यायला हवे, तेव्हा त्यांचा सर्वागीण विकास होईल. जिल्हा परिषद, नगरपालिका शाळेतील शिक्षक हे हुशारच असतात. तिथे शिकणारी मुलेही हुशार आहेत. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी संघटित रहायला हवे असे […]

अधिक वाचा..

कारेगावच्या अ‍ॅड संग्राम शेवाळे यांच्या “लंडन सफरनामा” पुस्तकाचे 9 सप्टेंबर रोजी पुणे येथे प्रकाशन

राजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील सुपुत्र अँड संग्राम शेवाळे हे लंडन येथे कायद्याचे (LLM) उच्च शिक्षण घेत असताना तेथील राजकीय, सामाजिक,शैक्षणिक ,ऐतिहासिक , पर्यावरण , आर्थिक आदी विषयांबाबत आलेल्या अनुभवांचे वर्णन त्यांनी “लंडन सफरनामा” या पुस्तकात शब्दद्ध केले असुन या पुस्तकाचे पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे 9 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता […]

अधिक वाचा..

बेट भागात वळसे पाटलांनी विकासाची गंगा आणली; पोपटराव गावडे

शिरुर (अरुणकुमार मोटे) भारतीय राज्य घटनेतील तरतूदीनुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये एकुण लोकसंख्येच्या ५२ टक्क्यापेक्षा आरक्षण द्यायच नाही. असे नमूद आहे. मात्र आपण ५२ टक्क्यांपर्यंत पोहचलो. आता यातून मार्ग काढला पाहिजे. यासाठी पुन्हा एकदा सरकार कामाला लागले आहे. परंतु समाजाच्या, तरूण पिढीच्या भावना तीव्र आहे. बेरोजगारी वाढत आहे. नोकरी मिळत नाही. त्यामुळे सामाजिक प्रश्नासाठी रस्त्यावर लढून चालणार […]

अधिक वाचा..
ramdas thite

भावी पीढीसाठी शिक्षकांचे योगदान सर्वश्रेष्ठ…

५ सप्टेंबर, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होत आहे. त्यांच्या विचारांचे पाईक, भावी पीढीच्या उत्कर्षाचे शिल्पकार म्हणून शिक्षकांचे योगदान निश्चितच प्रशंसनीय व राष्ट्रहिताचे आहे. शिक्षणाचे नवे जग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि जागतीकीकरणाचे संदर्भ समजावून घेत पुढे जाण्याचा संकल्प करुया. तमाम शिक्षक बांधव – भगिनिंना आजच्या शिक्षकदिनी मनःपूर्वक […]

अधिक वाचा..
aayushaman-bharat-shirur

शिरूर तालुक्यात आरोग्य केंद्राचे वाजले तीन तेरा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील सरकारी आरोग्य केंद्र (दवाखाना) चक्क दिवसाढवळ्या बंद अवस्थेत असून तेथे डॉंक्टर व कर्मचारी हजर नसल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे उपचार घ्यायला येणाऱ्या अनेक रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सरकार आरोग्य केंद्रावर भरमसाठ खर्च करत असताना दवाखान्यात पगार घेणारे एकही कर्मचारी, अधिकारी वेळेवर […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथे संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती हे स्थान महाराष्ट्रातील अष्टविनायकामधील आठवे स्थान म्हणुन प्रसिद्ध असुन त्याचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा महागणपती म्हणुन आहे. आज (दि 3) रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच आज संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या […]

अधिक वाचा..