पिंपळे खालसात स्वातंत्र्य सेनान्याचे जल्लोषात अभीष्टचिंतन

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे १९७६ साली आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये कारावास भोगलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पोपटराव विठ्ठलराव धुमाळ यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा एक्काहत्तर वा अभिष्टचिंतन उत्साहात साजरा केला असल्याने स्वातंत्र्यसेनानीच्या कार्याला उजाळा मिळाला आहे. पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलराव पोपटराव धुमाळ यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे 71 वे अभिष्टचिंतन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर […]

अधिक वाचा..

जिल्हा पुनर्वसन कार्यालयात माहिती अधिकार अर्जाला मिळताहेत मोघम उत्तरे

शिक्रापूर (शेरखान शेख): जिल्हा पुनर्वसन कार्यालय पुणे येथे माहिती अधिकार कायद्याला पायदळी तुडवले जात असल्याचा प्रकार राजरोसपणे सुरु असून सगळ्याच माहिती अधिकार अर्जांना सरसकट मोघम स्वरुपाची व विस्तृत स्वरुपाची मागणी केली म्हणून अर्ज निकाली काढले जात आहेत. एकाच माहिती अधिकार अर्जाला दोन वेगवेगळी उत्तरे दिली जात आहेत, अशी उडवा उडवीची उत्तरे देऊन अर्जदारांना माहिती देण्याबाबत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील युवासेनेची कार्यकारिणी जाहीर

शिक्रापुर (शेरखान शेख) बाळासाहेबांच्या शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या शिरूर तालुक्यातील सर्व युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर व युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे यांच्या प्रमुख पार पडली असून यावेळी युवा सेना शिरुर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.   शिरुर तालुका युवा सेना कार्यकारिणी नुकतीच […]

अधिक वाचा..

जातेगावच्या महाविद्यालया समोर भांडण करणाऱ्या टोळक्यावर गुन्हे दाखल

शिक्रापुर (शेरखान शेख) जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील श्री संभाजीराजे ज्युनियर कॉलेज समोर भांडण करणे एका टोळक्याच्या चांगलेच अंगलट आले असून भांडण करणाऱ्या प्रशांत बाळासाहेब इंगवले, ओंकार रमेश उमाप, ऋतिक बळवंत इंगवले, अमोल अशोक तांबे, संकेत संतोष सुक्रे या युवकांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक […]

अधिक वाचा..
Popatrao Dhumal

पिंपळे धुमाळ येथील स्वातंत्र्य सैनिकाला कुटुंबियांनी दिले वाढदिवसाचे सरप्राईज!

शिक्रापूर (तेजस फडके): पिंपळे धुमाळ येथील स्वातंत्र सैनिक पोपटराव विठ्ठलराव धुमाळ यांना ७१व्या वाढदिवसानिमित्त कुटुंबियांनी सरप्राईज दिल्यामुळे ते भाराऊन गेले होते. कुटुंबिय आणि नातेवाईंकांनी एकत्रित मिळून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. शिवाय, वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा दिला. शिवाय, शिंदे सरकारने निवृत्तीवेतनात वाढ केल्यामुळे सरकारचेही आभार मानले. स्वातंत्र सैनिक पोपटराव विठ्ठलराव […]

अधिक वाचा..

त्या गब्बर मंडल अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील बेट भागातील डोंगरगण येथे वाळूमाफीयांनी वाळू उपसा करून वाळू वाहतुक करताना एका शेतकऱ्याने त्यांचा रस्ता अडवल्याने त्याला जबर मारहाण करूण गंभीर जखमी केले आहे. शिरूर पोलिस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला असुन असा गंभीर प्रकार घडत असताना तेथील मंडल आधिकारी, तलाठी हे काय करत होते…? असा प्रश्न उपस्थित होत […]

अधिक वाचा..

वाघाळेच्या मुलींचा सतत सहा वर्ष तर मुलांचा आठ वर्ष खो खो मध्ये डंका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) यशवंतराव चव्हाण तालुका कला क्रिडा स्पर्धा मंगळवार (दि २२) रोजी रांजणगाव गणपती येथील मंगलमुर्ती विद्याधाम प्रशाला येथे पार पडल्या .गेल्या आठ वर्षापासुन वाघाळे येथील शाळेच्या मुलांनी सतत तालुका पातळीवर प्रथम क्रमांक मिळविला आहे तर मुलींच्या संघाने सतत सहा वर्षे प्रथम क्रमांक मिळवून वाघाळे गावाचे नाव शिरुर तालुक्यात झळकवले आहे. शिरुर-हवेलीचे आमदार […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ह.भ.प.गणेश महाराज फरताळे यांनी दशक्रियाचे मानधन नाकारले

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरोना काळामध्ये अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष मृत झाले तर काही मातेंचा मुलगा मृत झालेला असताना नुकतेच शिरुर तालुक्यातील एका मातेच्या दशक्रिया दरम्यान सदर मातेचा तरुण मुलगा कोरोनामध्ये मृत झाल्याचे समजताच ह. भ. प. गणेश महाराज फरताळे यांनी दशक्रिया विधीतील प्रवचनचे मानधन नाकारून समाजापुढे आदर्श निर्माण करुन दिला आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अर्जुन बढे यांची बिनविरोध निवड

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अर्जुन बढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन शिरुर येथे झालेल्या बैठकीत तसे निवडीचे पत्र त्यांना जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी दिले. यावेळी जिल्हाकार्यकारणी शरद पुजारी, शिरुर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे, माजी तालुकाध्यक्ष जालिंदर आदक, हवेली तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे, उपाध्यक्ष सुनिल पिंगळे, […]

अधिक वाचा..

वाघोली ते शिरुर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याचे काम सुरु होणार….

शिरुर (तेजस फडके): वाघोली ते शिरुर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेसाठीची निविदा प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सदर संस्थेसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लवकरच कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या या […]

अधिक वाचा..