शिरुर येथे शिवसेनेच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध

शिरुर (तेजस फडके) अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या विरोधात शिरुर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने राज्यपालांचा निषेध करण्यात आला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला यावेळी दुधाचा अभिषेक घालुन राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शिवसैनिकांनी नाराजी […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी परिसरात अनधिकृतपणे मुरुम आणि वाळू ऊपसा सुरु

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील बेट भागातील टाकळी हाजी मंडल आधिकारी कार्यक्षेत्रात टाकळी हाजी सह डोंगरगण, शिनगरवाडी येथे राजरोसपणे अनाधिकृतरीत्या मुरूम उपसा, वाळू उपसा सुरु असुन तेथील तलाठी, मंडल अधिकारी आर्थिक तडजोडीमुळे मात्र मुग गिळून गप्प असल्याची चर्चा बेट भागात रंगली आहे. तसेच नागरीकांच्या वारस नोंदी, खरेदीखताच्या नोंदी, तहसिलदार यांच्या आदेशाच्या नोंदी तलाठ्यांनी टाकल्यानंतर प्रमाणित […]

अधिक वाचा..

दोन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या BVG कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करा:- नाथा शेवाळे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी मधील फियाट कंपनीमध्ये दोन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या BVG कंपनीच्या संचालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर घटनेची चौकशी होऊन […]

अधिक वाचा..

पिंपळे जगतापच्या उपसरपंचपदी कुणाल बेंडभरच कायम

सरपंच ग्रामसेवक यांनी घेतलेली उपसरपंच पदाची निवड अवैध शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाचा अनेक दिवसांपासून सुरु असलेला पेच आता सुटला असून उपसरपंच पदी कुणाल बेंडभर हे कायम असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे उपसरपंच कुणाल बेंडभर यांची अतिक्रमण केलेले असल्याने त्यांचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या माजी विद्यार्थ्यांनी जपले शाळेचे ऋणानुबंध

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी तब्बल चौदा फॅन भेट शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबाबत कृतज्ञता व्यक्त करत शाळेबाबत आपुलकी म्हणून शाळेला तब्बल 14 फॅन भेट देत शाळेबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला शाळेच्या १९९९ ते २००० साली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा […]

अधिक वाचा..

बीट स्तरीय स्पर्धेत सादलगाव अव्वल

मांडवगण फराटा (संपत कारकूड): यशवंतराव कला-क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत न्हावरे बिट स्तरीय स्पर्धेत सादलगाव येथे (दि. १८) नोव्हेंबर रोजी झालेल्या क्रीडा स्पर्धेत सादलगाव जि. प. शाळेने मुले आणि मुलींच्या सांघिक स्पर्धेत खो-खो मध्ये लहान व मोठ्या या दोन्ही गटात विजेतेपद घेतले असून या शाळेला आता केंद्र स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या खामकर, […]

अधिक वाचा..

शिरुर विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांची तब्बल 29 वर्षांनी स्नेह संमेलनानिमित्त भरली शाळा

शिरुर (सतिश धुमाळ): आपल्या मैत्रीची यादगार आठवण राहावी. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धनाचा भाग म्हणुन येणाऱ्या पिढीला स्वच्छ हवा व हिरवळ अनुभवता यावी याकरिता तब्बल २९ वर्षांनी निमित्ताने एकत्रित आलेल्या शिरुर येथील विद्याधाम प्रशालाच्या सन १९९३ च्या इयत्ता १० वी च्या तुकडीतील विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी ५० झाडे शहरातील डोंगरावर लावली. शहरातील शिरुर देवराई सह्याद्रीचा वतीने पुणे […]

अधिक वाचा..
waghale school

विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना स्पर्धा मधून वाव मिळावा: पाचुंदकर

वाघाळे: विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना स्पर्धा मधून वाव मिळावा, असे माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी म्हटले आहे. शुक्रवारी (ता. १८) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघाळे येथे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा बीट पातळी पार पडल्या. स्पर्धांचे उद्घाटन माजी जि प सदस्य श्री. पाचुंदकर यांचे शुभ हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. स्पर्धेच्या माध्यमातून मुलांच्या […]

अधिक वाचा..

बाळासाहेबांची शिवसेना पुणे युवा जिल्हाप्रमुखपदी बाप्पुसाहेब शिंदे यांची नियुक्ती

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील सुपुत्र बाप्पुसाहेब शिंदे यांची नुकतीच बाळासाहेबांची शिवसेना पुणे युवा जिल्हाप्रमुखपदी निवड झाली असुन शिरुर-हवेली तसेच हडपसर विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रासाठी बाळासाहेबांची शिवसेना पुणे युवा जिल्हाप्रमुख म्हणून त्यांना शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे झालेल्या बैठकीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. […]

अधिक वाचा..

भिम आर्मीची कामगारांबाबत डाॅंगकाॅंग कंपनीशी सकारात्मक चर्चा

रांजणगाव गणपती (तेजस फडके): भिम आर्मी भारत एकता मिशन संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरूर तालुका प्रभारी संदिप शेलार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि 15) रोजी संविधानिक पध्दतीने जन आंदोलन करण्यात आले होते. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील डाॅंगकाॅंग कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात या संघटनेने आवाज उठवला होता. यावेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ […]

अधिक वाचा..