आपले गाव आपली निगराणी मोहीम राबवणार; प्रमोद क्षिरसागर

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या प्रत्येक गावाच्या सुरक्षिततेच्या हेतूने गावातील नागरिक व व्यावसायिकांच्या मदतीने आपले आग आपली निगराणी मोहीम राबवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाचशे CCTV बसले जातील असे नियोजन करण्यात येणार असून नागरिकांनी गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्तीत जास्त CCTV बसवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील गावांभेटी सुरु केलेल्या असताना अनेक गावांमध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याबाबतचा पुरावा मिळेल असे सीसीटीव्ही जास्त कोठे नसल्याने निदर्शनास आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आपले गाव आपली निगराणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून सीसीटीव्ही मुळे अनेक मोठ्या घटनांची उकल होते तर मोठ्या गुन्ह्यांची उकल देखील तातडीने होते.

मात्र सध्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक ठिकाणी हॉटेल, दुकाने, बँका येथे असलेले CCTV फक्त त्यांच्या घर व दुकानांच्या जागेपुरते असून रस्ता त्यामध्ये दिसत नसल्याने चित्र दिसत आहे. त्यामुळे आपण आता पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे नगर महामार्ग, चाकण शिक्रापूर रस्त्यासह मुख्य चौक, गावठाण येथील नागरिकांना भेटून आणि प्रत्येक गावातील पोलीस पाटील व पोलीस अंमलदार यांच्या माध्यमातून गावातील नागरिकांची भेट घेऊन त्यांना त्यांचे घर, दुकान, कंपनी मध्ये सीसीटीव्ही बसवून त्यामध्ये पूर्ण रस्ता व्यवस्थित दिसेल असे CCTV बसवण्याचे आवाहन करणार असून पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमध्ये पाचशे CCTV बसतील असे नियोजन करण्यात येणार आहे ज्यामुळे प्रत्येक गाव स्वतंत्र निगराणी खाली येतील आणि गावातील मालमत्तेचे रक्षण देखील होईल. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी केले आहे.