वढू बुद्रुकमध्ये स्वामींच्या चर्म पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चर्म पादुकांवर अभिषेक केल्यानंतर पादुका दर्शनासाठी खुल्या करण्यात आलेल्या असताना येथे दर्शनासाठी स्वामीभक्तांनी हजेरी लावत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे व नितीन भंडारे यांच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्यावेळच्या रोजच्या दैनंदिन वस्तू व चर्म पादुका […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात विद्युत वितरणच्या वतीने दुचाकी रॅली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रॅलीने विद्युत प्रबोधन शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे विद्युत वितरण विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन करत वीज चोरी, नवीन वीज कनेक्शन, सोलर कनेक्शनची माहिती नागरिकांना देत प्रबोधन करण्यात आले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे विद्युत वितरण विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्युत वितरण विभागाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शेतात आढळला मृत अवस्थेतील बिबट्या

शिरुर वनविभाग व प्राणीमित्रांनी पंचनामा करत घेतले ताब्यात शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथील गणपती माळ येथे एका शेतकऱ्याच्या शेतात मृतावस्थेतील बिबट्या आढळून आला असून शिरुर वनविभाग व वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या प्राणीमित्रांनी सदर मृत बिबट्याचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवून दिला आहे. करंदी (ता. शिरुर) येथील गणपती माळ येथे नलिनी वर्पे यांच्या […]

अधिक वाचा..

मानव विकास परिषदेकडुन मावळ अत्याचार प्रकरणी कारवाईची मागणी

शिरुर (तेजस फडके): मावळ येथील कोथुर्णे गावातील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर तिची झालेली हत्या खुपच वेदनादायी आहे. त्यामुळे पिडीत चांदेकर कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून मानव विकास परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष अफसर शेख, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक चौधरी, प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर, राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष जयश्री अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून शिरुर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. […]

अधिक वाचा..

पाबळला कंटेनर मधून पत्र्याचे रोल पडून मोठा अपघात

सुदैवाने जीवित हानी नाही मात्र दूध डेअरी सह वाहनांचे नुकसान शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथे बेल्हा जेजुरी या मुख्य रस्त्यावर एका कंटेनर मधून वाहतूक करण्यात येत असलेले तब्बल २२ टन वजनाचे २ पत्र्याचे रोल रस्त्यावर पडून अपघात होऊन येथील दूध डेअरी सह काही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. पाबळ (ता. शिरुर) येथे बेल्हा […]

अधिक वाचा..

नागपंचमीनिमित्त शिव भक्ताकडून नरेश्वर चरणी दीड किलो चांदीचे शिवलिंग

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्री क्षेत्र नरेश्वर मंदीर येथे एका शिव भक्ताकडून नागपंचमी निमित्ताने तब्बल दीड किलो वजनाचे चांदीचे शिवलिंग अर्पण करण्यात आले असून सदर शिवलिंग स्थानिक पदाधिकाऱ्यांसह शिव पुजारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्री क्षेत्र नरेश्वर मंदीर येथे एका शिव भक्ताने देवावरील श्रद्धा जपत मंदिरासाठी तब्बल दीड किलो […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

माळवाडी ग्रामपंचायतीमध्ये माळवाडी ग्रामविकास परीवर्तन ग्रामविकास पॅनेलचा ६-१ ने विजय

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्याच्या बेट भागात नव्यानेच स्थापण झालेल्या माळवाडी ग्रामपंचायतीमध्येही धक्कादायक निकाल हाती लागला असुन दामूशेठ घोडे यांच्या गटातील सोमा भाकरे यांच्या माळवाडी ग्रामविकास परीवर्तनने ६-१ असा दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या विरुद्ध माळवाडी ग्रामविकास पॅनेलच्या पॅनेल प्रमुख सोपान भाकरे यांच्यासह पॅनेलचा धक्कादायक पराभव झाला आहे. अंत्यत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत दामुशेठ गटाने […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

म्हसे ग्रामपंचायतमध्ये काळेश्वरी ग्रामविकास पॅनेलने ५-२ ने मिळवला विजय

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील म्हसे या नव्याने स्थापण झालेल्या ग्रामपंचायतीचा धक्कादायक निकाल हाती लागला असून म्हसे येथील निवडणुकीत माजी आमदार पोपटराव यांच्या गटातील प्रकाश वायसे यांच्या जय हनुमान विकास पॅनेलच्या विरोधात काळेश्वरी ग्रामविकास पॅनलचे प्रमुख दामुशेठ घोडे व काळूराम पवार यांच्या नेतृत्वाखाली 5- 2 ने रंगतदार विजय मिळवला आहे. अंत्यत चुरशीच्या झालेल्या या […]

अधिक वाचा..

मानव विकास परीषदेच्या युवक कार्याध्यक्षपदी शहाजी खळदकर

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथील शहाजी संतू खळदकर यांची मानव विकास परिषदेच्या शिरुर तालुका युवक कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. एक वर्षासाठी हि निवड असणार आहे. मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील असून, सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण राज्यात हि संस्था काम करत आहे. समाज्यातील भांडवलशाहीकडून […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षभर जागर करणार: अविनाश क्षीरसागर

शिक्रापूर: भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण होत असताना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे विचार आणखी प्रभावीपणे रुजवण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत क्रांतिकारकांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे खजिनदार प्राचार्य अविनाश क्षीरसागर यांनी केले. पाबळ (ता. शिरुर) येथील भैरवनाथ […]

अधिक वाचा..