शिरुर महावितरण विभागाकडून ग्राहकांची होतीये मोठ्या प्रमाणात लूट…

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरासह तालुक्यात घरगुती वापर असणाऱ्या ग्राहकांना रिडींग न घेता एका महिन्याकाठी एका ग्राहकाला तब्बल 1 लाख रुपये बील आकारले असल्याचे जांबुत येथील विदयुत ग्राहक विकास गाजरे यांनी सांगितले आहे.

महावितरण विभाग ग्राहकांची मोठया प्रमाणावर लुट करत असून मीटर रिडींग घेणाऱ्या एजन्सीवर कडक कारवाई करण्याची मागणी शिरुर तालुक्यातील जनतेकडून होत आहे. अशा प्रकारे चांडोह, वडनेर, जांबुत सविंदणे, कवठे येमाई, टाकळी हाजी, मलठण, आमदाबाद व शिरूर शहरात रिडींग न घेतल्यामुळे चुकीचे रीडींग येत आहे.

प्रत्यक्ष रिडिंग वेगळे आणि बिलांवर वेगळे या कारणामुळे ग्राहकाला विनाकारण बील जास्त भरावं लागत आहे. मीटरचे रेंडीग फोटो हा मोबाईल मध्ये काढत असेल्या मुळे मीटर चा फोटो त्यामध्ये अचुक येत नसल्यामुळे रेंडीग चुकीचे टाकत आहे. या चुकीच्या पद्धतीने रिडींगची तफावत असलेल्या मुळे विनाकारण बील भरण्याचा त्रास ग्राहकाला होत आहे.

सबंधित एजन्सीवर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा. अन्यथा मनसे स्टाईल ने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी दिला आहे.