केंदूरच्या सुक्रेवाडी जिल्हा परिषद शाळेला आदर्श शाळा पुरस्कार

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुक्रेवाडी या शाळेला महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा शाखा शिरुर यांच्या वतीने दिला जाणारा स्व. धर्मराज एकनाथ कर्पे गुरुजी स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुक्रेवाडी या शाळेची स्थापना १९५६ साली झाली आहे. इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंत असणाऱ्या या शाळेत सुंदर व आकर्षक बगीचा व परसबाग आहे. प्रत्येक वर्ग डिजीटल असून ई लर्निंगची सुविधा उपलब्ध आहेत. बोलका व्हरांडा तसेच आकर्षक कार्यालय आहे. अद्यावत स्वच्छता तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा असून शाळेच्या आदर्श कार्या बद्दल शाळेला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

यावेळी मुख्याध्यापिका सुरेखा पडवळ, सहशिक्षक धर्मेंद्र चौधरी, माजी उपसरपंच जयश्रीताई शहाजी सुक्रे, शालेय समितीचे अध्यक्ष मनेष थिटे, उपाध्यक्षा अश्विनी सुक्रे, प्रमोद सुक्रे, सुवर्णा सुक्रे या वेळी उपस्थित होते. तर शाळेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल मुख्याध्यापिका सुरेखा पडवळ व सहशिक्षक धर्मेंद्र चौधरी यांसह विदयार्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.