पुणे न्यायालयात वकीलांसाठी प्रथमच स्वतंत्र रुग्णवाहिका

अ‍ॅड. राजेंद्र उमापांकडून पुणे बार असोसिएशनकडे रुग्णवाहिका सुपूर्द शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्ह्यात संख्येने १५ हजारांपेक्षा जास्त असलेल्या पुणे न्यायालयातील सर्व वकीलांसाठी आणि सुमारे ५०० न्यायालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र उमाप यांच्याकडून नुकतीच सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात आली असून न्यायालयात वैद्यकीय आपत्कालीन सुविधा नसलेल्या पुण्यातील […]

अधिक वाचा..

शिक्रापूर बाजार मैदानाची ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने अखेर स्वच्छता 

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नसताना ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा चक्क बाजार मैदानात टाकल्याने बाजार रस्त्यावर भरवण्याची वेळ आलेली असताना याबाबत अनेकांनी तक्रारी करत काही वृत्त देखील प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने बाजार मैदानाची अखेर स्वच्छता केली आहे. शिक्रापूरचा कचरा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कचरा टाकण्यासाठी कोठे जागा […]

अधिक वाचा..

गोरक्षक शिवशंकर स्वामी यांना महाराष्ट्रभर पोलीस संरक्षण

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रामध्ये गोहत्येबाबत आवाज उठवीत स्वतःचा जीव धोक्यात घालत हजारो गोवंशाचे जीव वाचविणाऱ्या मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना शासनाकडून पुरवण्यात येणारे सशस्त्र पोलीस संरक्षण यापूर्वी पुणे जिल्हा मर्यादित असताना आता हे पोलीस संरक्षण पूर्ण महाराष्ट्र राज्यात देण्यात आले असल्याने गोराक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये गोरक्षणाचे काम करणाऱ्या शिवशंकर स्वामी यांनी […]

अधिक वाचा..
sevadham dahihandi

पिंपळे जगतापमध्ये सेवाधामच्या विशेष मुलांची अनोखी दहीहंडी…

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात गोकुळाअष्टमी निमित्ताने विशेष विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दहिहंडी उत्सव साजरा केला. यावेळी एका विद्यार्थ्याने श्रीकृष्णाची वेशभूषा साकारली होती. पिंपळे जगताप येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय येथे श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांच्या माध्यमातून विशेष मुलांच्या अनोख्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, श्रावण या विद्यार्थ्याने […]

अधिक वाचा..

मोराची चिंचोलीच्या निधीबाबत ग्रामस्थांची अण्णा हजारेंना भेट

शिक्रापूर: मोराची चिंचोली (ता. शिरुर) हे गाव राष्ट्रीय पक्षी मोरांच्या अस्तित्वासाठी ओळखले जाणारे गाव असून यासाठी शासनाकडून चालू केलेला पर्यटन निधी हा तेरा वर्षापासून बंद झाला असल्याने सदर निधी चालू करण्यासाठी नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जेष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. मोराची चिंचोली (ता. शिरुर) हे गाव सातत्याने दुष्काळ ग्रस्त […]

अधिक वाचा..

शिरुर न्यायालयाच्या निवृत्त अधिकाऱ्यालाच कामगाराचा गंडा

वरुडे येथील खळबळजनक घटना शिक्रापूर: शिरुर न्यायालयात अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीला शेतात कामाला असलेल्या कामगाराने गंडा घातल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विठ्ठल खामकर या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वरुडे (ता. शिरुर) येथे शिरुर न्यायालयात अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले निवृत्त अधिकारी पांडुरंग मुरकुटे यांची शेती असून त्यांनी […]

अधिक वाचा..
ST

पुणे ते केंदूर बस सेवा सुरु ठेवण्याची खासदार बापटांची सूचना

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील पुणे ते केंदूर ही गेली अनेक वर्षापासून सूरु असलेली PMPL बस बंद करण्यात आलेली असून सदर बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची सूचना पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी PMPL चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना एका पत्राद्वारे केली आहे. केंदूर (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु PMPL बसच्या अनेक […]

अधिक वाचा..

ग्रामीण भागातुन अनेक अधिकारी तयार व्हावेत: रमेश धूमाळ

शिक्रापूर: शालेय जीवनात जिद्द ठेवून अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळत असून ग्रामीण भागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घेऊन यश मिळवावे व ग्रामीण भागातून अनेक अधिकारी तयार व्हावेत, अशी भावना अतिरिक्त विशेष पोलीस महानिरीक्षक रमेश धूमाळ यांनी व्यक्त केली. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील जवाहर नवोदय विद्यालय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रमेश धुमाळ बोलत होते, यावेळी आयकर […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेत गुणीजनांचा गौरव सोहळा

ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचा अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठान व संशोधन केंद्राच्या समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या गौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील गुणीजन मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील चीमनापिर मळा रस्त्याची दुरवस्था

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील चीमनापिर मळा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असल्याने रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून येथील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील चिमणापिर मळा व शेणाचा मळा येथे जिल्हा परिषद शाळे पुढे रस्त्यावर खड्डे पडल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. […]

अधिक वाचा..