शिक्रापुरात बाबुराव पाचर्णे व विनायक मेटेंना श्रद्धांजली

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील भैरवनाथ मंदिर येथे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे व शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील भैरवनाथ मंदिर येथे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे व शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]

अधिक वाचा..

जातेगावच्या अविनाश कामठेंची इतिहास विषयात पीएचडी

जातेगाव बुद्रुक ग्रामस्थांकडून अविनाश कामठेंचा नागरी सन्मान शिक्रापूर: जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. अविनाश जयसिंग कामठे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथून इतिहास विषयावरील PHD डॉक्टरेट पदवी प्राप्त केली असल्याने नुकताच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सन्मान करण्यात आला आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील शेतकरी कुटुंबातील अविनाश कामठे यांनी परिस्थितीवर मात […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत मॅरेथॉन स्पर्धेने अमृतमहोत्सवाची सांगता

शिक्रापूर: कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले असताना कै. फक्कड व कै. भाऊसाहेब शिंदे स्मृती मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच संपन्न होत अमृत महोत्सवाची उत्साहात सांगता झाली आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था यांनी मोठ्या […]

अधिक वाचा..

केंदूर सह परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) सह परिसरातील करंदी व पिंपळे जगताप परिसरात देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून अनेक ठिकाणी ध्वजारोहण करत केंदूर येथील मेजर प्रदीप ताथवडे स्मारकात देखील माजी सैनिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. केंदूर (ता. शिरुर) सह परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना केंदूर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल येथे […]

अधिक वाचा..

प्राथमिक आरोग्य उपकेद्रांच्या चांगल्या सेवेमुळे नागरीकांमध्ये समाधान: सोनाली खैरे

सविंदणे: सविंदणे (ता. शिरुर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये तेथील डॉक्टरांकडून चांगल्या प्रकारची सेवा मिळत असल्याने नागरीकांची दवाखान्यासाठी बाहेरगावी होणारी धावपळ थांबली असून आर्थिक बचतही होत असल्याने गावातील नागरीकांमधून समाधान व्यक्त होत असल्याचे सरपंच सोनाली खैरे यांनी सांगितले आहे. कवठे (ता. शिरुर) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सविंदणे येथे हे उपकेंद्र चालू असून समुदाय आरोग्य आधिकारी डॉ. कोमल […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात अमृत महोत्सव निमित्त रॅली सह वृक्षारोपण

रॅलीमध्ये माजी सैनिकांसह, ग्रामपंचायत पदाधिकारी, व्यापारी सहभागी शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने माजी सैनिकांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करत माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तिरंगा रॅलीचे आयोजन करत गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सरपंच रमेश गडदे, उपसरपंच […]

अधिक वाचा..

आदिवासी समाजाच्या घरांसाठी काही जागा राखीव

शिरुर तालुक्यातील केंदूर ग्रामपंचायत घेणार अनोखा निर्णय शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील ठाकरवाडी येथे मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी समाजातील एका व्यक्तीचे घर कोसळले. ५ वर्षांपूर्वी झालेल्या पावसामध्ये देखील हेच घर कोसळून एका बालकाचा मृत्यू होत बालकाचे आई व आजी जखमी झाले होते. पुन्हा एकदा या कुटुंबावर हा प्रसंग उद्भवला असल्याने अशा आदिवासी ठाकर […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथपाल संतोष काळेंचा सन्मान

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने काही वाचन प्रेमी युवकांकडून राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करत ग्रंथपाल संतोष काळे यांचे विशेष सन्मान करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे भैरवनाथ मोफत वाचनालयच्या माध्यमातून वाचक ग्रंथालयाभिमुख होण्यासाठी ग्रंथपाल संतोष काळे हे सतत नवनवीन प्रयोग व संकल्पना राबवीत असल्यामुळे शिक्रापूरसह परिसरामध्ये शिक्रापूर ग्रामपंचायतच्या ग्रंथालयास […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशी व नागरिक त्रस्त

सलग ३ दिवस करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर रस्ता वाहतूक कोंडीने नेहमीच चर्चेत येत असणारा रस्ता असून मागील काही महिन्यांमध्ये या रस्त्याची वाहतूक कोंडीची ओळख पुसली जात असताना आता पुन्हा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे शिक्रापूरसह परिसरातील नागरिक व वाहन चालक या वाहतूक कोंडीने त्रस्त […]

अधिक वाचा..

आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत १४ विद्यार्थ्यांना घवघवीत यश

शिक्रापूर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेत मुखईच्या कै. रा. गे. पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयच्या तब्बल १४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाठ यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व […]

अधिक वाचा..