कान्हूर मेसाईत मॅरेथॉन स्पर्धेने अमृतमहोत्सवाची सांगता

शिरूर तालुका

शिक्रापूर: कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले असताना कै. फक्कड व कै. भाऊसाहेब शिंदे स्मृती मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच संपन्न होत अमृत महोत्सवाची उत्साहात सांगता झाली आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था यांनी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला दरम्यान प्राचार्य अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून बबन शिंदे, मनोज शिंदे व संतोष शिंदे यांच्या वतीने कै. फक्कडमामा शिंदे व कै. भाऊसाहेबमामा शिंदे स्मृती मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. गावामध्ये प्रथमच मॅरेथॉन स्पर्धा संपन्न होत असल्याने अनेकांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला तब्बल पंच्याहत्तर स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला सदर स्पर्धेचे उदघाटन बबन शिंदे, कक्ष अधिकारी अजय खर्डे, सदाशिव पुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मनोज शिंदे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष गंगाधर पुंडे, अमोल पुंडे, बंडू पुंडे, बिभीषण मिडगूले, सुदाम तळोले, प्रा. मच्छिंद्र राऊत, विनोद शिंदे, अशोक मिडगूले, अमोल मिडगूले, ज्ञानेश्वर पुंडे, चंद्रकांत धुमाळ, अविनाश दौडकर, धनंजय तळोले, राजेंद्र पिंगळे, आदेश मिडगूले, संतोष साळे यांसह आदी उपस्थित होते. आयोजित या स्पर्धेत प्रथम क्रमांक संकेत बाबासाहेब जाधव, द्वितीय क्रमांक रोहन भोकनळ, तृतीय क्रमांक हनुमंत मिडगूले, चतुर्थ क्रमांक प्रथमेश वाघोले, पाचवा क्रमांक विशाल जाधव यांनी पटकाविला तसेच या स्पर्धेत मंगेश नाणेकर यांनी ५ किलोमीटरचे अंतर तब्बल १८ मिनिटांमध्ये पूर्ण करण्याचा विक्रम नोंदवला, सर्व विजेत्यांना बबन शिंदे, मनोज शिंदे व संतोष शिंदे यांच्या वतीने सन्मान चिन्ह तसेच बक्षीस देत गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्य अनिल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.