केंदूर सह परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

शिरूर तालुका

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) सह परिसरातील करंदी व पिंपळे जगताप परिसरात देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून अनेक ठिकाणी ध्वजारोहण करत केंदूर येथील मेजर प्रदीप ताथवडे स्मारकात देखील माजी सैनिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

केंदूर (ता. शिरुर) सह परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना केंदूर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल येथे मुख्याध्यापक अनिल साकोरे यांच्या हस्ते, ग्रामपंचायत सह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विविध कार्यकारी सोसायटी येथे पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, सरपंच अविनाश साकोरे व उपसरपंच योगिता थिटे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.

केंदूर गावातील पर्‍हाडवाडी, शिळकवाडी, सुक्रेवाडी, पाचवड, पऱ्हाड मळा, ठाकर वस्ती याठिकाणी देखील स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. तर गावाचे सुपुत्र मेजर प्रदीप ताथवडे यांच्या स्मारक समोरील ध्वजारोहण माजी सैनिक सुभेदार एरंभ साळेकर, नायब सुभेदार सुदाम चौधरी, हवालदार बाजीराव थिटे, हवालदार सतिश थिटे, नाईक सुभाष सुक्रे, शिपाई अमोल ताथवडे, नाईक पांडूरंग पऱ्हाड, सुभाष साकोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.

करंदी ग्रामपंचायत व सोसायटी येथे सरपंच सोनाली ढोकले व उपसरपंच पांडुरंग ढोकले यांच्या हस्ते तसेच जे. जे. इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी शाळेचे संस्थापक माजी सभापती शंकर जांभळकर, संचालिका दिव्या जांभळकर यांच्या हस्ते तसेच पिंपळे जगताप गावातील सयाजीराव गायकवाड विद्यालयात संस्थाचालक विश्वासराव जगताप तर ग्रामपंचायत येथे सरपंच सोनल नाईकनवरे व उपसरपंच शुभांगी शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून परिसरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा झाला आहे.