ऊसाची एकरी संख्या योग्य राखण्यासाठी रोपांची लागवड करा: अविनाश निर्मळ

शिंदोडी (तेजस फडके) : एका एकर जमिनीतुन ४० ते ४५ हजाराच ऊस कारखाण्याला जात असल्याने फुटव्यांचे नियंत्रण राखल्यास एकरी ४० ते ४५ हजार फुटवे राखता येतात. तसेच एका ऊसाचे वजन अडीच किलो झाल्यास एकरी सहज शंभर टनापर्यंत मजल मारता येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे अविनाश निर्मळ यांनी सांगितले. निर्वी (ता. […]

अधिक वाचा..

आमदाबाद येथील वकील रंगनाथ थोरात यांचे निधन

शिरूरः घोडगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तसेच शिरूर वकील बार असोसियनचे माजी अध्यक्ष रंगनाथ थोरात (वय ६२, रा. आमदाबाद) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरळात शोककळा पसरली आहे. पुण्यातील संचेती हॉस्पीटल येथे उपचार घेत असताना त्यांचा आज दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यांनी राजकीय, सामाजिक, वकील अशी अनेक पदे भुषविली आहे. काही दिवसांपुर्वी त्यांचा […]

अधिक वाचा..

पुढील आयुष्य समाजकार्यासाठी घालवा : श्रीहरी पावसे

वरुडेः शिंगाडवाडी शाळेचे आदर्श मुख्याध्यापक दिपक नाथू जगताप वयाची 58 व नोकरीची 30 वर्षे पूर्ण करून 30 जून 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त शाळा शिंगाडवाडी व व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सेवापुर्ती निमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षीय भाषणात कोंढापुरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे म्हणाले, ‘श्री. जगताप सर यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुकला बिबट्यांच्या पिलांच्या अफवेने खळबळ; काय आहे पाहा…

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे गेली दोन वर्षात अनेक नागरिकांवर बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही बिबटे पिंजऱ्यात जेरबंद झाले असताना शुक्रवारी (ता. १) सकाळच्या सुमारास येथील शेतात काम करणाऱ्या नागरिकांना बिबट्या सदृश प्राण्याची पिल्ले दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील आदित्य भंडारे यांच्या उसाच्या शेतात काही […]

अधिक वाचा..

Video: एकाच दिवशी नऊ अनधिकृत बांधकामावर पीएमआरडी चा हातोडा

वाघोली (तेजस फडके): केसनंद गट नंबर १०१ आणि १०२ येथे PMRDA च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागा मार्फत वाणिज्य स्वरूपाची चार अनधिकृत बांधकामे तसेच पाच अनधिकृत चालू बांधकामे अशी एकूण १०४५० स्क्वेअर फुटाची ९ बांधकामे पाडण्यात आली आहेत. या अनधिकृत बांधकाम धारकांना महाराष्ट्र नगररचना कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली होती. हि बांधकामे पडण्याची कारवाई पाच पोकलेन मशिनच्या […]

अधिक वाचा..

शिरूर तहसिल कार्यालयात तीन एंजट करताहेत नागरिकांची लूट…

सविंदणे: शिरुर तहसिल कार्यालयात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी नागरीकांची ३ एजंटामार्फत मोठी आर्थिक लुट होत आहे. या ३ खाजगी व्यक्तींना शासनाचा कुठलाही पगार नसताना ते काम करत आहे. शिरुर शहरातील गॅस एजन्सीमार्फत मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या कर्मशियल वापरासाठी काळया बाजारात गॅस टाक्यांची विक्री केली जाते. याबाबत संबंधित गॅस एजन्सी धारकांवर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या […]

अधिक वाचा..

करंदीत एकच रात्रीत दोन ठिकाणी चोऱ्या

सोन्याच्या दागिन्यांसह ६ लाख ९२ हजारांचा ऐवज चोरी शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथील भारत गॅस फाटा परिसरात (दि. २७) जून रोजी एका घरासह एका हॉटेल मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल ६ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात ५ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

…म्हणून शासकीय भूखंडात बांधली स्मशानभूमी

अहवाल सादर करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतला आदेश शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे स्मशानभूमी नसताना देखील जिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या नावे असलेल्या जमिनीत स्मशानभूमी बांधल्याची घटना समोर आली असल्याने याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिक्रापूर ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी मधील जमीन गट नंबर ४२/५०/५८९ मधील प्लॉट […]

अधिक वाचा..

ध्येय प्राप्तीसाठी सकारात्मक उर्जा महत्वाची: प्रा. ईश्वर पवार

शिक्रापूर: शालेय जीवनात युवकांना कोणतेही ध्येय पूर्ण करायचे असल्यास विद्यार्थ्यांमध्ये जिद्द तसेच सकारात्मक उर्जा आवश्यक असल्याचे मत चांदमल ताराचंद महाविद्यालयाचे प्रा. ईश्वर पवार यांनी व्यक्त केले. आलेगाव पागा (ता. शिरुर) येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या शाहू महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थी गुणवत्ता वाढ […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयात चक्क रात्रीस खेळ चाले…

शिरुर: शिरुर तहसिल कार्यालय हे आधिकाऱ्यांमुळे चक्क रात्रीच्या वेळी सुरु होत असून आर्थिक मलिदा दिलेल्या अनेक फायलींवर तहसिलदारांच्या सह्या होत असल्याचे नागरीकांनी सांगितले आहे. तहसिलदार यांची बदली होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने गौणखणिज केसेस, रस्ता केसेस, १५५ च्या केसेस बंद होऊन जाता जाता फाईलवर सही घेण्यासाठी तहसिल कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. दोन दिवसात रात्रीच्या […]

अधिक वाचा..