निमगाव म्हाळुंगीत महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील एका महिलेला दाम्पत्याने दिलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने प्रवीण प्रकाश शिर्के व प्रियांका प्रवीण शिर्के या दाम्पत्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील हिराबाई शिर्के यांना त्यांचा मुलगा प्रवीण शिर्के व सून प्रियांका शिर्के हे वारंवार मानसिक त्रास […]

अधिक वाचा..

पिंपळे जगतापच्या मतीमंद विद्यार्थ्यांनी घेतला योगाचा आनंद

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला असून येथील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मतीमंद विद्यार्थ्यांनी देखील योगाचा आनंद घेतला आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापक पवन कट्यारमल, क्रिडा शिक्षक संजय पोटफोडे, मानसशास्त्रज्ञ नृसिंह कुलकर्णी यांनी विविध योगा प्रात्यक्षिके […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी

शिक्रापूर: शिरुर येथील बाबुराव नगर मधील पेराडाईज सोसायटी मध्ये राहणारे मनोहर ढमढेरे हे सायंकाळच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेले दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास ढमढेरे हे घरी आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असता कपाट उघडले आणि त्यातील सोन्याच्या २ अंगठ्या आणि काही रोख रक्कम चोरीला गेली […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभारच्या कल्पेशला शोधण्यास धावला सारा गाव

तब्बल दीड तासात त्या बालकाला केले पालकांच्या स्वाधीन शिक्रापूर: हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेत नव्याने दाखल झालेला कल्पेश सूर्यवंशी हा मुलगा शाळेतून अचानक गायब झाल्याचे समोर येताच संपूर्ण गावातील युवकांनी एकवटून तब्बल दीड तासाच्या प्रयत्नाने त्या बालकाला शोधून शिक्षकांच्या उपस्थितीत पालकांच्या स्वाधीन करुन एकजुटीची ताकद दाखवून दिली आहे. हिवरे कुंभार (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

एका कंपनीच्या परिसरात नागानेच गिळला चक्क विषारी घोणस साप

शिक्रापूर: वन्य प्राण्यांमध्ये नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमधून सर्वात विषारी समजला जाणारा साप आहे. मात्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळून येणारा घोणस साप नागापेक्षा जास्त विषारी असून या विषारी घोणस सापाला चक्क एका नागाने गिळल्याचा प्रकार पुणे नगर महामार्गा लगतच्या एका कंपनीच्या परिसरात समोर आला आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या परिसरात दोन साप निघाले […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील नरेश्वर डोंगरावर आढळल्या दुर्मिळ जातीच्या पाली

लेपर्ड गेको जातीच्या पाली वन्यजीव प्रेमींच्या निदर्शनास शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील नरेश्वर डोंगरावर (दि. २१) जून रोजी सकाळच्या सुमारास काही सर्पमित्र गेले असता त्यांना दुर्मिळ अशा बिबट्याच्या रंगा सारख्या दिसणाऱ्या दुर्मिळ लेपर्ड गेको जातीच्या पाली आढळून आल्या आहेत. सणसवाडी (ता. शिरुर) येथील नरेश्वर डोंगरावर (दि. २१) जून रोजी सकाळच्या सुमारास सर्पमित्र श्रीकांत भाडळे, सर्पमित्र […]

अधिक वाचा..

हुमणी नियंत्रणसाठी प्रकाश सापळा ठरेल प्रवाही: जयवंत भगत

शिंदोडी: चिंचणी (ता.शिरुर) येथे कृषि विभागाच्या माध्यमातून हुमणी नियंत्रणसाठी प्रकाश सापळा लावुन भुंगेरे नष्ट करण्याची मोहीम जोरदार राबविली जात असुन सामुहिक पध्दतीने हुमणी नियंत्रणसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. ऊस क्षेत्रात हुमणी किडीचा प्रादुर्भाव होऊन ऊसाचे उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रकाश सापळा लावण्याचे आवाहन केले आहे. निर्वी येथील संजय बळवंत सोनवणे यांनी […]

अधिक वाचा..

किरकोळ कारणातून महिलेसह कुटुंबियांना मारहाण: सहा जणांवर गुन्हे दाखल

शिकापूर: जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे किरकोळ कारणातून महिलेसह तिच्या पती व मुलीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानदेव नामदेव ढोबळे, शुभम ज्ञानदेव ढोबळे, शेशराव ज्ञानदेव ढोबळे, देवगन ज्ञानदेव ढोबळे, कान्हू ज्ञानदेव ढोबळे, आशाबाई ज्ञानदेव ढोबळे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील केंदूर रोड […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात युवकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

शिक्रापूर: शिरुर (ता. शिरुर) येथील सावतामाळी नगर येथे किरकोळ वादातून युवकाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे गोवर्धन नारायण साबळे व ऋषिकेश गोवर्धन साबळे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील रामलिंग रोड येथे राहणारे मिथुन सिंग व ऋषिकेश साबळे यांच्या मध्ये फोनच्या किरकोळ […]

अधिक वाचा..

शिरुरकरांमुळे लेकासहित तिला मिळाले हक्काचे माहेर

शिरुर तालुका अखिल भारतीय मराठा महासंघच्या वतीने निराधार महिलेस माहेर संस्थेत आसरा शिरुर: गेल्या काही दिवसापासून शिरुर परिसरात फिरणाऱ्या निराधार महिलेस तिच्या तीन वर्षाच्या लहान मुलासह “माहेर” संस्थेत आसरा मिळवून देण्याचे काम शहरातील सामाजिक कार्यकर्त्यानी केले. शिरुरकरांच्या जागृकतेमुळे या निराधार मायलेकांना हक्काचा निवारा तसेच आधार मिळाला असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसु उमटले. शिरुर शहरात गेल्या काही […]

अधिक वाचा..