Shirur Robbery

नगर-पुणे रस्त्यावरील हॉटेलच्या पार्किंगमध्ये कुटुंबाला पहाटेच्या सुमारास लुटले…

क्राईम

अहिल्यानगर: नगर-पुणे रस्त्यावरील हॉटेल कन्हैयाच्या पार्किंगमध्ये मोटार उभी करून कुटुंब विश्रांतीसाठी थांबले होते. यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना उठविले. मोटारीचा दरवाजा उघडताच मारहाण करून महिलांच्या गळ्यातील चार लाख 60 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकाराबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत रितेश सुरेश पटवा (रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पटवा व त्यांचे कुटुंबीय मोटारीने नातेवाइकांच्या लग्नाला पुण्याला गेले होते. मंगळवारी दुपारी विवाह सोहळा आटोपून ते नगरमार्गे पाथर्डीकडे जात होते. नगरजवळील केडगाव बाह्यवळण चौकात येईपर्यंत पहाट झाली होती. चालकाला झोप आल्याने त्यांनी नगर-पुणे रस्त्यावरील हॉटेल कन्हैयाच्या पार्किंगमध्ये मोटारकार उभी केली आणि मोटारीतच सर्वजण झोपले.

दरम्यान, पहाटेच्या सुमारास अचानक तीन अनोळखी तरुण आले. चला उठा उठा. घाबरू नका, असे म्हणून त्यांची काचेवर थाप मारली. फिर्यादीच्या आईने दरवाजा उघडला असता त्यांनी गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्यास सुरुवात केली. रितेश पटवा यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कोयत्याच्या मुठीने मारहाण करण्यात आली. चोरट्यांनी आई व पत्नीच्या गळ्यातील दागिने असा 4 लाख 60 हजारांचा ऐवज चोरून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान…

पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडी येथे दरोड्याच्या तयारीत थांबलेले तिघे जेरबंद…

पुणे-नगर महामार्गावर अनोळखी महीलेला अज्ञात वाहनाची धडक, मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान

थरारक! शिरूरमधील व्यापाऱ्याला नगर-सोलापूर रोडवर दिवसाढवळया लुटले…