Shikrapur Police Station

अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद

क्राईम

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची सणसवाडीत धडाकेबाज कारवाई

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर अडीच वर्षापासून फरार राहून देखील दरोडा व खंडणी सारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले असून निलेश नाथा दरेकर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

सणसवाडी (ता. शिरुर) येथे निलेश दरेकर याने २०२० मध्ये अल्पवयीन युवतीचा विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली होती, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले असताना निलेश हा फरार झाला होता. त्याचा तपास शिक्रापूर पोलीस करत असताना तो वेळोवेळी शिक्रापूर पोलिसांना चकवा देत होता.

दरम्यान त्याने पुन्हा सणसवाडी येथे त्याच्या साथीदारांच्या मदतीने खंडणी व दरोड्या सारखे गंभीर गुन्हे केले. त्यानंतर सदर आरोपीस पकडण्याचे आव्हान शिक्रापूर पोलिसांपुढे उभे राहिले होते, तर नुकताच निलेश दरेकर हा सनसवाडी येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाचे किशोर शिवणकर यांना मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, पोलिस नाईक रोहिदास पारखे, किशोर शिवणकर, निखिल रावडे, अमोल दांडगे, विकास पाटील, शिवाजी चितारे, सागर कोंढाळकर, जयराज देवकर, लखन शिरसकर यांच्या पथकाने साध्या वेशात सणसवाडी येथे सापळा लावला असता त्यांना निलेश दरेकर आलेला दिसून आला.

यावेळी पोलिसांच्या पथकाने निलेश नाथा दरेकर रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. सदर आरोपीला अटक करत शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पठारे हे करत आहे.