rekha-bandal

पुणे-नगर रस्त्यावर रेखा बांदल यांच्या मोटारीची फोडली काच अन्…

क्राईम

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल यांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी 40 हजार रुपये व इतर महत्त्वाची कागदपत्रे चोरुन नेली आहेत.

हा प्रकार बुधवारी (ता. 6) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान पुणे-नगर रस्त्यावरील अल्फा डायग्नोस्टिकसमोर घडाला आहे. चोरट्यांनी पर्ससह 40 हजारांची रोकड, डेबिट कार्ड, आधार व पॅन कार्ड लंपास केले आहे. या प्रकरणी रेखा मंगलदास बांदल (वय 42, रा. बांदल कॉम्प्लेक्स मागे, शिक्रापूर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा बांदल या बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अमोल भोसले यांच्यासह खराडी येथील श्रीराम सोसायटीमध्ये मैत्री साम्राज्य ग्रुपने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांची कार अल्फा डायग्नोस्टिक समोरील सार्वजनिक रोडवर पार्क केली होती. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर त्या कारजवळ आल्या. त्यावेळी त्यांना कराचा डाव्या बाजूची काच फुटलेली दिसली. त्यांनी कारमध्ये पाहणी केली असता कारच्या मागील सीटवर ठेवलेले साहित्य गायब होते.

चोरट्यांनी गाडीची काच फोडून मागिल सीटवरील सर्व साहित्य चोरुन नेले. यामध्ये पर्समध्ये ठेवलेली 40 हजार रुपयांची रोकड, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, दोन डेबिट कार्ड चोरट्यांनी चोरून नेले. विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप करपे करीत आहेत.

शिरुर तालुक्यात वाढली बांदल व मांढरेंची ताकद

मंगलदास बांदल यांच्या डोक्यात नेमके काय?

मंगलदास बांदलांनी घेतली पार्थ पवार ची भेट

शिरुर तालुक्यात बांदलांचा लागेना मेळ, मांढरेंचा कळेना खेळ…